Monalisa Net Worth :

  अनेकांना आयुष्यात संघर्ष करावा लागतो. यशाची शिखरे चढल्यानंतरही संघर्षाचा काळ कोणीही विसरत नाही. बहुतांशी कलाकाराच्या नशिबी स्ट्रगलच लिहिलेला असतो. सध्या स्टार असणाऱ्या अनेक कलाकारांनादेखील स्ट्रगल करावा लागला आहे. कधीकाळी दिवसरात्र मेहनत करून 120 रुपये कमावणारी अभिनेत्री आज कोट्यधीश आहे. 


भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारामध्ये अभिनेत्री मोनालिसाच्या (Monalisa) नावाचाही समावेश होतो. मोनालिसाने भोजपुरी चित्रपटसृष्टीत आपलं स्टारडम कमावले आहे. भोजपुरी सिनेमात काम करण्यासोबतच मोनालिसाने टीव्ही मालिकांमध्येही काम करून आपला ठसा उमटवला आहे. पण तिला खरी ओळख त्यांना भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतूनच मिळाली.


मोनालिसाने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज ती लक्झरी लाईफ जगते. त्यांच्याकडे सर्व सुख-सुविधा आहेत. ती करोडो रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे. पण एक काळ असा होता जेव्हा मोनालिसा रात्रंदिवस काम करून 120 रुपये कमवू शकत होती.


16 व्या वर्षी हॉटेलमध्ये केले काम...


मोनालिसाचा जन्म 21 नोव्हेंबर 1982 रोजी कोलकाता येथे झाला. मोनालिसाचे खरं नाव हे अंतरा विश्वास आहे. मोनालिसाने वयाच्या 16 व्या वर्षीच एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम केले होते. तिला या कामासाठी अवघे 120 रुपये मिळत असे.


बी-ग्रेड चित्रपटात केले काम...


मोनालिसा पहिल्यांदा ओडिया भाषेतील व्हिडिओमध्ये  झळकली होती. आज मोनालिसा हे भोजपुरी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. मोनालिसाला एकेकाळी बी-ग्रेड चित्रपटांमध्येही काम करावे लागले होते.




या मालिकेत दाखवली अभिनयाची जादू...


मोनालिसा  रिॲलिटी शो बिग बॉसच्या 10व्या सीझनमध्येही सहभागी झाली होती. बिग बॉसमध्ये आल्यानंतर अभिनेत्रीला टीव्ही मालिकांमध्येही काम करण्याची संधी मिळाली. मोनालिसाने 'नजर 1' आणि 'नजर 2' या मालिकांमध्ये काम केले आहे. यामध्ये तिने एका भूताची भूमिका साकारली. ही भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली. याशिवाय मोनालिसाने 'बेकाबू' शोमध्येही काम केले आहे.


भोजपुरी चित्रपटात झाली स्टार... 


2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कहां जायबा राजा नजरिया लडाईके' या पहिल्या भोजपुरी चित्रपटातून मोनालिसा स्टार बनली. निरहुआसोबतचा तिचा पहिला भोजपुरी चित्रपट हिट ठरला होता. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. भोजपुरी व्यतिरिक्त, अभिनेत्रीने तेलगू, तमिळ, कन्नड, हिंदी, ओरिया आणि बंगाली भाषांमधील 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.


मोनालिसाकडे किती संपत्ती?


कधीकाळी हॉटेलमध्ये काम करणारी मोनालिसा आज कोट्यधीश आहे. मोनालिसाकडे आज 20 कोटींच संपत्ती आहे.  मोनालिसा ही एका भोजपुरी चित्रपटासाठी जवळपास 10 लाख रुपये मानधन घेते.