मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर आपल्या पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. कंगना अनेकदा बॉलिवूडकरांवर टीकेची झोड उठवत असते. आता कंगनाने आलिया भट्टच्या दिशेनं आपल्या मोर्चा वळवला आहे. आलियाचा आगामी चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी'वरुन कंगनानं तिच्यावर टीकास्त्र डागलं आहे. 


कंगना रनौत एका अहवालावर प्रतिक्रिया देत होती. ज्यामध्ये म्हटलंय की, कोरोना व्हायरस महामारीमुळे थलायवी डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे. कंगनानं हे वृत्त खोटं असल्याचं सांगितलं. तसेच तिनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक घोषणा केली आहे. तिने लिहिलं आहे की, "थलायवीचे डिजिटल राइट अॅमेझॉन आणि नेटफ्लिक्स (हिंदी)सोबत आहेत."


कंगनानं पुढे लिहिलं आहे की, "दोघांपैकी कोणीही थिएटरमध्ये रिलीज करण्यापूर्वी आपल्या प्लॅटफॉर्मवर स्ट्रिमिंग करु शकत नाही. थलायवी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. खोटा प्रचार करणाऱ्या मीडियाविरोधात सक्त कारवाई केली जाईल."


कंगनाची इन्स्टा स्टोरी : 




आलियाच्या अभिनयावरुन कंगनाची टीका 


कंगनाने 'गंगूबाई काठियावाडी'मधील आलियाच्या अभिनयावरही टीकास्त्र डागलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "मीडियाने एका चित्रपटाबाबत लिहिलं आहे, ज्याच्या ट्रेलरवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली आणि खराब अभिनयाची चेष्ठाही करण्यात आली होती. एका छोट्या मुलाला गँगस्टर म्हणून कास्ट करण्यात आलं आहे. तसेच तो चित्रपट आता डिजिचल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे."


कंगनाच्या बहिणीने शेअर केला स्क्रिनशॉर्ट 


कंगनानं पुढे लिहिलं आहे की, "जो चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर पडला आहे, त्यासंदर्भात लिहा. कारण त्याचा रिअॅलिटी चेक झाला आहे की, हा चित्रपट एक चूक आहे." कंगनाची बहिणी रंगली चंदेलने एका न्यूजचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला होता. ज्यामध्ये संजय लिला भन्साळी यांच्याद्वारे 'गंगूबाई काठियावाडी'च्या ओटीटी रिलीजसाठी सांगितलं जात होतं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :