वरुण धवन, आलिया भट्टच्या वाढत्या जवळकीने नताशा दलालने घेतला होता 'हा' निर्णय
वरुणने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटापासून केली ज्यामध्ये आलिया भट्ट त्याची सहकलाकार होती. या चित्रपटानंतर हे दोघेही बर्याच चित्रपटांमध्ये दिसले आणि त्यांची बॉन्डिंग ऑफ स्क्रीन चांगली झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमीडिया रिपोर्टनुसार वरुणची आलियाबरोबरची वाढती जवळीक नताशाला आवडत नव्हती. अगदी चित्रपटांमध्येही वरुण आणि आलियाचे किसिंग सीन पाहून तिला राग आला होता. दुसरीकडे, त्यावेळी आलिया भट्टला डेट करत असलेला सिद्धार्थ मल्होत्राही वरुण-आलियाची जवळीक पाहून इनसिक्योर झाला होता.
यानंतर, वरुण आणि आलियाच्या जवळीकीमुळे अस्वस्थ होऊन नताशाने शूटिंगवेळी वरुणला कंपनी द्यायला सुरुवात केली. जेणेकरून ती त्याच्यावर लक्ष ठेवेल. सूत्रांच्या माहितीनुसार नताशा इंडस्ट्रीची पार्श्वभूमी नसल्याने सुरुवातीला तिला हे पचवणे जड जात होते. परंतु, हळूहळू तिला बॉलिवूडच्या वर्क कल्चरची सवय लागली आणि तिला समजले की आलिया-वरुणची बॉन्डिंग केवळ मैत्रीपुरती मर्यादित आहे. स्टुडंट ऑफ द इयरखेरीज वरुण-आलियाने बद्रीनाथ की दुल्हनिया, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, कलंक सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.