(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जान्हवी कपूर बनली पायलट; आगामी सिनेमातील लूक व्हायरल
भारतातील पहिली महिला कॉम्बॅट पायलट गुंजन सक्सेना हिच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. गुंजन सक्सेनाने 1999 च्या कारगिल युद्धादरम्यान स्वत:चा जीव धोक्यात घालून जवानांचे प्राण वाचवले होते.
मुंबई : श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरने ‘धडक’ सिनेमातून रुपेरी पडद्यावर एन्ट्री घेतली. दिग्दर्शक करण जोहरनं या सिनेमाची निर्मिती केली होती. आता जान्हवी पुन्हा एकदा करण जोहर यांच्या सिनेमात झळकणार आहे.
जान्हवीच्या दुसऱ्या सिनेमातील तिचा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. करण जोहर यांच्या 'तख्त' सिनेमातून जान्हवी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Here’s the 1st look of Janhvi as Gunjan Saxena: The first female IAF pilot who evacuated injured soldiers from Kargil in 1999. THIS IS THE BEST CHRISTMAS GIFT EVER!!!! 🙏🏽🇮🇳 #JanhviKapoor pic.twitter.com/yPJXrK4Kff
— Janhvi Kapoor FC (@JanhviFC) December 26, 2018
भारतातील पहिली महिला कॉम्बॅट पायलट गुंजन सक्सेना हिच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. गुंजन सक्सेनाने 1999 च्या कारगिल युद्धादरम्यान स्वत:चा जीव धोक्यात घालून जवानांचे प्राण वाचवले होते.
युद्धात जखमी झालेल्या जवानांना रुग्णालयात पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं होतं. तिच्या या कार्यक्रमासाठी तिला शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
जान्हवीच्या आगामी सिनेमातील तिचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. करण जोहर या सिनेमाची निर्मिती करणार हे समोर आलं आहे, मात्र या सिनेमाचं दिग्दर्शन कोण करणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.