एक्स्प्लोर
आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी डिनर डेटसाठी पुन्हा एकत्र, चर्चांना उधाण
‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’,‘बागी 2’यांसारख्या दमदार चित्रपटांमध्ये दिशा पाटनीने प्रमुख भूमिका बजावल्या आहेत.
मुंबई : 'भारत' चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत असलेली अभिनेत्री दिशा पटानी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. या वेळी चर्चेचं कारण ठरलं आहे ते म्हणजे युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेसोबतचं डिनर. मुंबईतील एका हॉटेलबाहेर आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी एकत्र दिसले.
'एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी','बागी 2' यांसारख्या दमदार चित्रपटांमध्ये दिशा पाटनीने प्रमुख भूमिका बजावल्या आहेत. याआधीसुद्धा दिशासोबत आदित्य ठाकरे एका डिनरसाठी गेले होते. त्यावेळी त्यांची खूप चर्चा झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे दोघं एकत्र दिसून आले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या मैत्रीची चर्चा पुन्हा रंगली आहे.
जुहूमधील एका हॉटेलच्या बाहेर हे दोघे दिसून आले असून त्याचा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोवरुन अनेकांनी दिशाला ट्रोल केलं आहे. दिशा कायम आपल्या कथित बॉयफ्रेण्ड टायगर श्रॉफसोबत दिसते. पण तिला आता आदित्य ठाकरेंसोबत पाहणं अनेकांच्या पचनी पडलेलं नाही. दोघांना एकत्र पाहून नेटिझन्स 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' यांसारख्या कमेंट करुन दिशाला ट्रोल करु लागले. या डिनरसाठी दिशाने लाल रंगाचा क्रॉप टॉप आणि डेनिमचा शॉर्ट स्कर्ट घातला होता. तर आदित्य ठाकरेने पिवळ्या रंगाचं टीशर्ट आणि जीन्स पॅन्ट घातली होती. VIDEO | आदित्य ठाकरे विधानसभा लढणार? | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझाView this post on Instagram#dishapatani with #adityathackeray snapped for dinner in juhu #viralbhayani @viralbhayani
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement