नवी दिल्ली : सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेता रवीकिशनने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत रवीकिशनने दिल्लीत भाजपप्रवेश केला.

गरीबांचा विचार करणाऱ्या पक्षात येऊन आनंद झाल्याच्या भावना रवीकिशनने व्यक्त केल्या आहेत. इतरांच्या अवमानापेक्षा विकासावर आपला भर असेल, असं रवीकिशनने स्पष्ट केलं. दिल्ली भाजपचे प्रमुख आणि खासदार मनोज तिवारी यांनी रविवारी ट्विटरवर रवीकिशनचा भाजपप्रवेशाचा निर्णय जाहीर केला होता.

मनोज तिवारी आणि रवीकिशन हे भोजपुरी आणि हिंदी चित्रपटातील प्रथितयश कलाकार आहेत. रवीकिशनने 2014 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र दिल्लीतील उत्तर-पूर्व मतदारसंघात त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.

अभिनेत्री रिमी सेन भाजपमध्ये


यापूर्वी निवडणुकांच्या तोंडावर दलिप ताहिल, रिमी सेन यासारख्या बॉलिवूड कलाकारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर रवीकिशननेही भाजपचा रस्ता धरला आहे.