तिरुअनंतपूरम: सोशल मीडियावर चर्चेत असलेली मल्याळम अभिनेत्री भावना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अज्ञात टोळीने आपलं अपहरण करुन विनयभंग केल्याचा दावा भावनाने केला आहे.

याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. केरळमधील कोची शहरात ही घटना घडल्याचा दावा भावनाने केला आहे.

अथनीजवळ भावनाची कार अडवून, आरोपींची टोळी गाडीत घुसली. त्यानंतर चालत्या गाडीत विनयभंग केल्याचा आरोप, भावनाने केला.

याप्रकरणी पोलिसांनी भावनाचा कारचालक मार्टिनला अटक केली आहे.

ज्या टोळीने विनयभंग केला, त्यांच्यात माझा पूर्वीचा कार ड्रायव्हरही होता, असं भावनाने पोलिसांना सांगितलं.

विनयभंग करुन आरोपी टोळी दुसऱ्या गाडीने पळून गेले.

या प्रकारानंतर हादरलेल्या भावनाने कक्कानंद परिसरातील एका दिग्दर्शकाच्या घरी आसरा घेतला. सर्व प्रकार दिग्दर्शकाला सांगितल्यानंतर, त्यांनी पोलिसांना माहिती दिली.