एक्स्प्लोर
बलात्कार प्रकरणी अभिनेत्याला अटक

कोलकाता : कोलकातामधील एक अभिनेता आणि फोटोग्राफरने एका तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी शनिवारी अटक केली आहे. या तरुणीची अभिनेत्री बनण्याची इच्छा होती. पीडित तरुणीने स्थानिक पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर अनिकेत डॉन याला बलात्कारप्रकरणी अटक केली आहे. पोलीस स्थानकात दाखल तक्रारीनुसार, डॉनने या तरुणीला चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























