एक्स्प्लोर
अभिनेता नील नितीन मुकेश लवकरच बाबा बनणार!
नील आणि रुक्मिणी यांनी मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये उदयपूरमध्ये धूमधडाक्यात लग्न केलं होतं.
![अभिनेता नील नितीन मुकेश लवकरच बाबा बनणार! Actor Neil Nitin Mukesh soon to be father अभिनेता नील नितीन मुकेश लवकरच बाबा बनणार!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/04/24130122/Neil_Nitin_Mukesh.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश लवकरच बाबा बनणार आहे. नीलने पत्नी रुक्मिणी सहाय गरोदर असल्याची गोड बातमी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांसोबत शेअर केली.
"आता आम्ही दोघांचे तीन होणार आहोत," असं नील नितीन मुकेशने त्याच्या लेटेस्ट पोस्टमध्ये लिहिलं आहे. याचसोबत नीलचे वडील नितीन मुकेश यांनीही ही गुडन्यूज आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे.
नील आणि रुक्मिणी पहिल्यांदाच आई-बाबा बनणार आहे. त्यामुळे हे क्षण त्यांच्यासोबत कुटुंबीयांसाठीही खास आहेत.
नील आणि रुक्मिणी यांनी मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये उदयपूरमध्ये धूमधडाक्यात लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच शाहिद कपूरनेही दुसऱ्यांदा बाबा बनणार असल्याची गुडन्यूज शेअर केली होती. आता नील नितीन मुकेशनेदेखील ही खास बातमी सगळ्यांसोबत शेअर केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)