R Madhavan New President Of FTII : दाक्षिणात्य अभिनेता आर. माधवनच्या (R Madhavan) 'रॉक्रेटी : द नंबी इफेक्ट' (Rocketry: The Nambi Effect) या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अशातच अभिनेत्याची आता फिल्म अॅन्ड टेलिव्हिडन इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (Film And Television Institute Of India) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर (Anurag Thakur) यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 


अनुराग ठाकुर यांनी अध्यक्षपदी आर.माधवनची नियुक्ती झाल्याचं ट्वीट करत जाहीर केलं असून अभिनेत्याचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे,"एफटीआयआयच्या (FTII) अध्यक्षपदी आर.माधवनची नियुक्ती झाली असून अभिनेत्याचे खूप-खूप अभिनंदन. तुझा आतापर्यंतचा अनुभव या संस्थेला आणखी समृद्ध करेल. सकारात्मक बदल घडवून आणेल आणि तिला 
आणखी वेगळ्या पातळीवर नेईल. खूप-खूप शुभेच्छा". अनुराग ठाकुर यांच्या ट्वीटवर आर.माधवनने आभार मानत लिहिलं आहे,"तुमच्या शुभेच्छांसाठी खूप-खूप आभार.. तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन". 










FTII च्या यशात भारतीय सिनेसृष्टीचं मोठं योगदान 


FTII च्या यशात भारतीय सिनेसृष्टीचं मोलाचं योगदान आहे. एफटीआयआयने भारतीय सिनेसृष्टीला राजकुमार हिरानी, मणी कौल, श्याम बेनेगलसारखे निर्माते आणि नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी आणि ओम पुरीसारखे अनेक दर्जेदार अभिनेते दिले आहेत. 


आर. माधवनच्या 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट'ला राष्ट्रीय पुरस्कार


आर. माधवनच्या 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. हा सिनेमा वैज्ञानिक नंबी नारायणन यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म या कॅटेगरीमध्ये नामांकन जाहीर झालं आहे. 20 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेला हा सिनेमा प्रेक्षक अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकतात. 


संबंधित बातम्या


Rocketry : The Nambi Effect : 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होताच आर. माधवन म्हणाले...