Vijay Deverakonda And Samantha Ruth Prabhu Kushi Review : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) यांचा 'खुशी' (Kushi) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आजवर दोघांनीही अनेक सुपरहिट सिनेमे दिलेले आहेत. आता प्रदर्शित झालेला 'खुशी'देखील (Kushi Review) प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.


'खुशी'चं कथानक काय आहे? (Kushi Movie Story)


विप्लव (विजय देवरकोंडा) आणि आराध्या (समंथा रुथ प्रभू यांची प्रेमकहाणी प्रेक्षकांना 'खुशी' या सिनेमात पाहायला मिळत आहे. विप्लव आणि आराध्या दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. कालांतराने दोघेंचे कुटुंबीय हे एकमेकांपेक्षा वेगळे असल्याचा अंदाज त्यांना येतो. पण आता प्रेमात पडलेल्या या दोघांचा आनंद किती काळ टिकणार आणि दोघे आपलं नातं पुढे घेऊन जाणार का? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमाचा पाहावा लागेल.   


'खुशी'चे दिग्दर्शक शिव निर्माण (Shiva Nirvana) नेहमीच नात्यांवर भाष्य करणाऱ्या कलाकृती घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतात. आता 'खुशी'च्या माध्यमातून ते नात्यांवर भाष्य करणारी एक वेगळी गोष्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 


विप्लव हा बीएसएनएल कर्मचारी असून काश्मीरमध्ये काम करण्याची इच्छा आहे. मणिरत्नमप्रमाणे त्याला आयुष्य जगायचं आहे. एआर रहमानचं संगीत त्याला आवडतं. दरम्यान त्याच्या आयुष्यात आराध्याची एन्ट्री होते. पाहताक्षणी विप्लव आराध्याच्या प्रेमात पडतो आणि सिनेमा रंजक वळणावर येतो.


विल्पवचे वडील सत्यम म्हणजेच आपले मराठमोळे अभिनेते सचिन खेडेकर हे नास्तिक आहेत. तर दुसरीकडे आराध्याच्या घरी खूपच धार्मिक वातावरण आहे. पण या परिस्थितीत विल्पव आणि आराध्याच्या प्रेमाची ताकद किती आहे हे दाखवणारा 'कुशी' हा सिनेमा आहे. 


'खुशी' हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे. हेशम अब्दुलचं संगीत उत्तम आहे. एक हटके प्रेम कहानी प्रेक्षकांनाही भावली आहे. विजय देवरकोंडा आणि समंथा रुथ प्रभू दोघांचही काम उत्तम झालं आहे. दोघांची मजेशीर केमिस्ट्री पाहताना एक वेगळीच मजा येते. 


विजय देवरकोंडाने विप्लवच्या भूमिकेतील मुलगा आणि व्यक्ती या दोन्ही जबाबदाऱ्यांना योग्य न्याय दिला आहे. तर दुसरीकडे आनंदी राहणाऱ्या आराध्यानेही आपली भूमिका चोख बजावली आहे. 'खुशी' या सिनेमातील अॅक्शनपासून ते विनोदापर्यंत सर्वकाही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतं. 'खुशी' या सिनेमाचं सर्व उत्तम असलं तरी एडिटिंगवर आणखी मेहनत घ्यायला हवी होती, असं वारंवार वाटतं. सिनेमातील क्यायमॅक्स प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देणारे आहेत. 'खुशी' हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत एक चांगला संदेश देण्याचंही काम करतो. 


Vijay Deverakonda, samantha :  शूटिंग दरम्यान समंथा आणि विजय देवरकोंडा यांच्यासोबत दुर्घटना; स्टंट करताना दुखापत