एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जितेंद्र यांनी माझा लैंगिक छळ केला, चुलत बहिणीचा आरोप
अत्याचार झालेल्या मुली समोर येऊन तक्रार दाखल करत आहेत. यातूनच हिंमत मिळाली असून अत्याचाराविरोधात तक्रार दाखल केल्याचं पीडित महिलेनं म्हंटलं आहे.
शिमला : वादापासून नेहमी दूर असलेले ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र वयाच्या 75 व्या वर्षी वादात अडकले आहेत. जितेंद्र यांच्यावर त्यांच्या चुलत बहिणीने लैंगिक छळाचा आरोप केला आहे.
जितेंद्र यांच्याविरोधात हिमाचल प्रदेशमधील पोलिस ठाण्यात लैंगिक छळाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण 47 वर्षापूर्वीचं असल्याचं समजतं आहे.
पीडित महिलेने त्या घटनेनंतर अनेक वर्ष आपण त्या धक्क्यात असल्याचं म्हटलं आहे. मात्र अत्याचार झालेल्या मुली समोर येऊन तक्रार दाखल करत आहेत. यातूनच हिंमत मिळाली असून अत्याचाराविरोधात तक्रार दाखल केल्याचं पीडित महिलेनं म्हंटलं आहे. महिलेने पोलिसांना तिची ओळख उघड न करण्याची विनंती केली आहे.
महिलेने नेमका काय आरोप केला आहे?
“मी 18 वर्षांची होती, तेव्हा जितेंद्र यांनी मला शूटिंग दाखवायला नेले. शूटिंग बघायला मिळालं म्हणून मी खुश होते. पण तिथे गेल्यावर मी विचार केला नव्हता असे घडले. जितेंद्र यांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यावेळी जर हे आई-वडिलांना कळले असते, तर त्यांच्यासाठी लाजिरवाणी परिस्थिती निर्माण झाली असती म्हणून मी शांत राहिले.”, असा आरोप महिलेने केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
करमणूक
निवडणूक
Advertisement