मुंबई : अभिनेता गोविंदाच्या पायाला बंदुकीची (Actor Govinda Bullet Injury ) गोळी लागली होती. बंदुक साफ करत असतान आज (1 ऑक्टोबर) पहाटे ही दुर्घटना घडली होती. स्वसंरक्षार्थ गोविंदा ही गोळी वापरायचे. दरम्यान, आज सकाळी बंदुक साफ करत असताना चुकून ट्रिगर दबला गेल्याने ही दुर्घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण भारतभरातून त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात होती. दरम्यान, आता खुद्द गोविंदा यांनीच एक ऑडिओ क्लिप शेअर करत त्यांच्या प्रकृतीविषयी तसेच घडलेल्या दुर्घटनेविषयी माहिती दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती ठिक असून त्यांच्या पायातील गोळी काढण्यात आली आहे.
गोविंदाने यांना नेमकी काय माहिती दिली?
अभिनेता गोविंदा यांनी थेट रुग्णालयातूनच एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. "नमस्कार, प्रमाण मी गोविंदा. मला गोळी लागली होती. तुमच्या सर्वांच्या, माझ्या-आई-वडिलांच्या कृपेने आता ती काढण्यात आली आहे. येथील सर्व डॉक्टर तसेच आदरणीय डॉक्टर अग्रवाल यांना धन्यवाद देतो. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेमुळे तुम्हा सर्वांचे धन्यवाद," असे गोविंदा यांनी सांगितलं आहे.
गोविंदा यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवला
मिसफायर झाल्यामुळे गोविंदा यांच्या पायाला गोळी लागली होती. या घटनेनंतर त्यांच्या चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात होती. या घटनेनंतर गोविंदा यांच्या गोल्डब बिच या परिसरातील घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आहे. गोविंदा यांच्यावर अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
गोविंदा यांच्या मुलीने दिली माहिती
गोविंदासोबत घडलेल्या दुर्घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर डॉक्टरांनीही त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया केली. त्यांच्या पायातील घोळी आता बाहेर काढण्यात आलेली आहे. घडलेल्या या प्रकाराबद्दल गोविंदा यांची मुलगी टीना आहुजा यांनी सविस्तर माहिती दिली आहे. माझ्या वडिलांची प्रकृती सध्या पहिल्यापेक्षा चांगली आहे. त्यांच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यांना सध्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे, असं टीना आहुजा यांनी सांगितलं.
हेही वाचा :