मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवलेला अभिनेता गोविंदा उर्फ गोविंद अरुण आहुजा यांच्या पायाला मंगळवारी पहाटे बंदुकीची गोळी लागल्याची घटना घडली. या घटनेत गोविंदा (Govinda) हे जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने नजीकच्या क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करुन त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जुहू पोलिसांनी (Mumbai Police) सध्या संबंधित रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतले असून ते सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे.

Continues below advertisement

ही घटना समोर आल्यानंतर सुरुवातीला गोविंदा यांच्याकडे असलेल्या परवानाधारक पिस्तुलमधून चुकून गोळी सुटल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यानंतर ही घटना नेमकी कशी घडली याबाबत वेगवेगळ्या थिअरी समोर येताना दिसत आहेत. यापैकी पहिल्या थिअरीनुसार अभिनेता गोविंदा हे त्यांच्या घरात रिव्हॉल्व्हर साफ करत होते. त्यावेळी अनावधानाने रिव्हॉल्व्हरचे ट्रिगर चुकून दाबले गेले आणि बंदुकीची गोळी गोविंदाच्या पायात शिरल्याचे सांगितले जाते. 

तर दुसऱ्या एका थिअरीनुसार,  अभिनेता गोविंदा ही घटना घडली तेव्हा जुहू येथील बंगल्यावर एकटेच होते. ते पहाटे साडेपाच वाजता घाईगडबडीत बाहेर निघाले होते. त्यावेळी गाडीत बसताना गोविंदा यांच्याकडील रिव्हॉल्व्हरचे लॉक ओपन होते. गाडीत बसताना रिव्हॉल्वरचा खटका चुकून दाबल गेला आणि बंदुकीची गोळी त्यांच्या पायात शिरली, असे सांगण्यात येते. या प्रकारानंतर अभिनेता गोविंदा यांनी कोणाविरोधात तक्रार केलेली नाही. गोविंदा यांच्या पायाला गोळी लागल्यानंतर खूप रक्त वाहत होते. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांच्यावर क्रिटी केअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या पायावर काहीवेळापूर्वीच तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते. सध्या क्रिटी केअर रुग्णालयात प्रचंड पोलीस बंदोबस्त आहे. मात्र, एकंदरीत ही घटना कशी घडली, याबाबत अद्यापही संभ्रम आणि संशयाचे वातावरण आहे. 

Continues below advertisement

गोविंदा यांचा शिंदे गटात प्रवेश

अभिनेता गोविंदा यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. ते वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली नव्हती. गोविंदा यांनी आपल्या राजकारणाच्या पहिल्या इनिंगमध्ये वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लढताना भाजपचे बलाढ्य नेते राम नाईक यांचा पराभव केला होता.

VIDEO: अभिनेता गोविंदाच्या पायात लागली गोळी

आणखी वाचा

मोठी बातमी: अभिनेता गोविंदाच्या पायात गोळी घुसली, रुग्णालयात उपचार सुरु, मिसफायर झाल्याचा संशय