एक्स्प्लोर

Dilip Kumar Health Update : दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा, निधनाच्या केवळ अफवा; पत्नी सायरा बानो यांची माहिती

Dilip Kumar Health Update : दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून निधनाच्या केवळ अफवा पसरवल्या जात असल्याची माहिती पत्नी सायरा बानो यांनी दिली आहे. प्रकृती अस्वास्थामुळे बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांना रविवारी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Dilip Kumar Health Update : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रविवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुंबईतील खार येथील हिंदुजा रुग्णालयात दिलीप कुमार यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, सध्या त्यांच्या प्रकृतीती सुधारणा होत असून त्यांना येत्या दोन ते तीन दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. परंतु, काल (रविवार) पासूनच दिलीप कुमार यांच्या निधनाच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्या पत्नी यांनी प्रतिक्रिया दिली असून निधनाच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. 

त्यासोबतच दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाउंटवरुनही हेल्थ अपडेट शेअर करण्यात आलं आहे. सायरा बानू यांनी एएनआयशी बोलताना म्हटलं की, दिलीप कुमार यांना गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. परंतु, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीती सुधारणाही होत आहे. त्यांनी दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन हेल्थ अपडेट जारी केलं आहे. 

दिलीप कुमार रुग्णालयात दाखल 

सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबत एबीपी न्यूजला माहिती दिली. त्या म्हणाल्या की, "दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यामुळेच त्यांना आज सकाळी साडेआठ वाजता मुंबईतील खार येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे नॉन कोविड रुग्णालय आहे. डॉ. नितिन गोखले यांच्या देखरेखीखाली दिलीप कुमार यांच्या सगळ्या चाचण्या करण्यात येत असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तुम्ही सर्वजण त्यांच्यासाठी प्रार्थना करा की, ते लवकर ठिक होवोत."

डिसेंबर 2020 पासूनच दिलीप कुमार यांची नाजूक आहे. अशातच सायरा बानो यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना आज सकाळी रुग्णालयातच दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांची प्रकृती नाजूक आहे, तसेच त्यांची रोगप्रतिकार शक्तीही कमी आहे. यापूर्वीही दिलीप कुमार यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी सायरा बानो यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यास चाहत्यांना सांगितलं होतं. 

याच मुलाखतीत बोलताना सायरा बानो यांनी त्यांच्या आणि दिलीप कुमार यांच्या नात्याबाबत खुलासा केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, ज्यावेळी त्या 12 वर्षांच्या होत्या त्यावेळी बॉलिवूड लेजेंड दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्यावर त्यांचा जीव जडला होता. त्यानंतर त्यांनी शेवटी दिलीप कुमार यांच्याशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. सायरा बानो यांनी बोलताना दिलीप कुमार आणि त्यांच्या पहिल्या भेटीबाबतही सांगितलं होतं. मुंबईतील महबूब स्टुडियोमध्ये त्या दिलीप कुमार यांना पहिल्यांदा भेल्या होत्या आणि पहिल्या भेटीतच त्या दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या. 

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Pilgaonkars Guru: सचिन पिळगावकर कुणाला मानतात आपले गुरू? कोणाकडून काय शिकले? गुरूंबद्दल केला मोठा खुलासा!
सचिन पिळगावकर कुणाला मानतात आपले गुरू? कोणाकडून काय शिकले? गुरूंबद्दल केला मोठा खुलासा!
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
Aamir Khan Raj Thackeray Imran Khan: भाच्याला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?
भाच्याला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?
Ajinkya Deo Maherchi Saadi: 'माझ्या नावे अजून एक फ्लॉप चित्रपट'; अजिंक्य देव 'माहेरची साडी'बाबत काय म्हणाले? सगळे रडले अन्...
'माझ्या नावे अजून एक फ्लॉप चित्रपट'; अजिंक्य देव 'माहेरची साडी'बाबत काय म्हणाले? सगळे रडले अन्...

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe on GenZ : जेनझीबाबत समाजात गैरसमज आहेत, माझी जेनझीबाबत मतं वेगळी आहेत.. तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?
जेनझीला दांभिकपणा बिल्कूल आवडत नाही, तुकाराम मुंढे जेनझींची आवडणारी गोष्ट सांगत म्हणाले...
Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
Nashik Accident News:सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
Gold Rate Weekly Update : चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
Washim Crime News: किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
Kolkata Tragedy : गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
Embed widget