एक्स्प्लोर
अभिनेता अर्शद वारसीच्या गुडघ्याला दुखापत
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. अर्शदवर सध्या मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून, त्याला डॉक्टरांनी दोन आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
“मी टँगो डान्स करत होतो, तेव्हा मला दुखापत झाली. मला दोन आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. खूप औषधं घ्यावी लागत आहेत.”, असंही अर्शद वारसीने ट्विटरवरुन आपल्या चाहत्यांना सांगितलं.
https://twitter.com/ArshadWarsi/status/879950172557631488
अर्शद वारसीने पायाचे काही फोटो ट्वीट करत, आपण सुखरुप असल्याचेही सांगितले आहे.
अर्शद वारसीवर डॉ. अली इराणी हे उपचार करत आहेत. अर्शदने त्यांच्यासोबतचाही फोटो ट्वीट केला आहे.
https://twitter.com/ArshadWarsi/status/879958470144995328
दरम्यान, अर्शद पूर्णपणे सुखरुप असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement