एक्स्प्लोर
अभिनेता अनिकेत विश्वासरावचा साखरपुडा
अभिनेत्री स्नेहा चव्हाणसोबत अनिकेत विश्वासरावचा रविवारी साखरपुडा झाला.

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील 'चॉकलेट हिरो' अशी ओळख असलेला अभिनेता अनिकेत विश्वासराव लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अभिनेत्री स्नेहा चव्हाणसोबत अनिकेतचा साखरपुडा झाला. विशेष म्हणजे हे अरेंज मॅरेज आहे. पुण्यातील हिंजवडीमध्ये रविवारी पाच ऑगस्टला स्नेहा-अनिकेतचा साखरपुडा झाला. स्नेहा मूळ पुण्याची आहे, तर अनिकेतचं बालपण मुंबईतील बोरीवलीमध्ये गेलं. अनिकेत आणि स्नेहाचं लग्न जून महिन्यातच ठरलं होतं. स्नेहाची आई आणि अनिकेतची मावशी एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. या ओळखीतून दोघं भेटले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघांनी साखरपुडा लगोलग केला असला, तरी बोहल्यावर चढण्याची त्यांना घाई नाही. तूर्तास करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा दोघांचा इरादा आहे.
37 वर्षीय अनिकेत विश्वासरावने 'अल्फा मराठी' वाहिनीवरील 'नायक' मालिकेतून पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'झी मराठी'वरील 'ऊनपाऊस' मालिकेत त्याने साकारलेली सागरची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावली होती. तेव्हापासूनच अनिकेत अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत झाला. कळत नकळत, एकापेक्षा एक, महाराष्ट्राचा सुपरस्टार, सुपर वुमन यासारख्या कार्यक्रमातही तो झळकला. याशिवाय लव्ह बर्ड, सुर्याची पिल्ले, नकळत सारे घडले या नाटकातही त्याच्या भूमिका गाजल्या. बघतोस काय मुजरा कर, पोस्टर बॉईज, पोस्टर गर्ल, नो एन्ट्री पुढे धोका आहे, फक्त लढ म्हणा यासारख्या चित्रपटात अनिकेत दिसला. अनिकेत आणि स्नेहा चव्हाण आगामी 'हृदयात वाजे समथिंग समथिंग' या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. स्नेहाने यापूर्वी स्वप्नील जोशीच्या 'लाल इश्क' या चित्रपटात भूमिका केली होती. अनिकेत-स्नेहाच्या साखरपुड्याचे फोटो

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion