एक्स्प्लोर

बलात्काराच्या आरोपांनंतर आलोकनाथ यांची प्रकृती बिघडली!

'तारा' मालिकेच्या लेखिका आणि निर्मात्या विनता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.

मुंबई : बलात्काराच्या आरोपांमध्ये अडकलेले बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी अर्थात अभिनेते आलोकनाथ यांची तब्येत बिघडली आहे. #MeToo मोहीमेत नाव आल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. 'तारा' मालिकेच्या लेखिका आणि निर्मात्या विनता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. "यानंतर आलोकनाथ यांची तब्येत बिघडली आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. या वादावर आता आलोकनाथ यांच्या वतीने त्यांचे वकील अशोक सरावगी बोलतील. आलोकनाथ यांची प्रकृती बिघडल्यामुळे मीडियाने सहकार्य करावं. एक-दोन दिवसात आलोकनाथ स्वत: मीडियाशी बोलतील," असं आवाहन सरावगी यांनी मीडियाला केलं आहे. आलोकनाथ यांची प्रतिक्रिया विनता यांच्या आरोपांनंतर 'एबीपी न्यूज'ने अलोकनाथ यांची बाजू जाणून घ्यायचा प्रयत्न केला. 'त्यांनाच विचारा. मला का विचारता? महिलेने सांगितलं ते ब्रह्मवाक्य असतं ना? मग तेच खरं असेल. माझी बाजू जाणून घेऊन काय कराल? तुम्हाला हवं ते लिहा. मी जे बोलेन त्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? सगळे तिच्यावर (विनता)च विश्वास ठेवणार. माझ्यावर आरोप तर लागले, मात्र काळासोबत सत्य समोर येईल.' असं अलोकनाथ म्हणाले. #MeToo ही चांगली चळवळ आहे, पण आपण फक्त महिलांची बाजू ऐकून घेतो, कारण त्यांना कमजोर मानलं जातं, असंही अलोकनाथ म्हणाले. काय आहे प्रकरण? 80 आणि 90 च्या दशकात टीव्ही इंडस्ट्रीत लेखिका-दिग्दर्शिका-निर्माती म्हणून ओळख मिळवलेल्या विनता नंदा यांनी अलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. विनिता यांनी लिहिलेली 'तारा' ही मालिका 1993 मध्ये लोकप्रिय झाली होती. त्याच काळात अलोकनाथ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होते. विनता नंदा यांनी सोमवारी रात्री फेसबुक पोस्ट लिहून आरोप केले आहेत. पोस्टमध्ये त्यांनी अलोकनाथ यांच्या नावाचा उल्लेख केलेला नसला, तरी तसे थेट संकेत त्यांनी दिले आहेत. 'त्याची पत्नी माझी बेस्ट फ्रेंड होती. आमचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं. मी तारा नावाची मालिका लिहित होते. तो माझ्या मालिकेतील नायिकेच्या मागे होता. तो दारुडा, निर्लज्ज होता, मात्र त्या दशकातील स्टार होता. माझ्या नायिकेला तो सेटवर त्रास द्यायचा, पण सगळे मूग गिळून गप्प होते. तिने आमच्याकडे तक्रार केली तेव्हा आम्ही त्याला काढून टाकायचा निर्णय घेतला. दोघांमध्ये शेवटचा सीन शूट करुन त्याला नारळ दिला जाणार होता, पण त्याला कुणकुण लागली. त्याच दिवशी तो दारु पिऊन सेटवर आला. शॉटला बोलवेपर्यंत तो पीत बसला. कॅमेरा रोल होताच तो नायिकेच्या अंगचटीला आला. तिने त्याला कानफटात लगावली. मी सांगितलं, यापुढे तू आमच्या कोणत्याही मालिकेत दिसणार नाहीस. नंतर मित्रांच्या मध्यस्थीमुळे आम्ही पुन्हा बोलायला लागलो' असं विनिता नंदा सांगतात. 'त्या व्यक्तीने (अलोकनाथ) आपल्या घरी आयोजित केलेल्या पार्टीला मी गेले होते. काही मित्रही तिथे होते. माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळलं आहे, असं मला वाटत होतं. मला जरा वेगळंच जाणवायला लागलं. रात्री दोनच्या सुमारास मी पार्टीतून निघाले, पण कोणीच मला घरी सोडायला येण्याची तयारी दाखवली नाही, हे मला जरा विचित्रच वाटलं. तिथे फार काळ थांबणं मला ठीक वाटत नव्हतं, त्यामुळे घर लांब असूनही मी पायी जाण्याचं ठरवलं' असं विनता यांनी पुढे लिहिलं आहे. 'अर्ध्या रस्त्यात असताना त्याने (अलोकनाथ) माझ्याजवळ गाडी थांबवली आणि मला घरी सोडण्याचं आश्वासन दिलं. त्याच्यावर विश्वास ठेवून मी गाडीत बसले. त्यानंतर नेमकं काय झालं हे मला अंधुक आठवतंय. पण माझ्यावर दारु उडवली जात होती आणि माझं लैंगिक शोषण केलं जात होतं. मी दुसऱ्या दिवशी झोपेतून उठले, तेव्हा वेदनेची जाणीव झाली. माझ्यावर फक्त बलात्कार झाला नव्हता, तर माझ्याच घरात माझ्यावर भीषण अत्याचाराचा झाले होते' असा दावा विनता यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Kshitish Date On Dharmaveer 3: 'धर्मवीर 3' कधी येणार? एकनाथ शिंदेंची भूमिका साकरणाऱ्या अभिनेत्यानं थेटच सांगून टाकलं, म्हणाला...
'धर्मवीर 3' कधी येणार? एकनाथ शिंदेंची भूमिका साकरणाऱ्या अभिनेत्यानं थेटच सांगून टाकलं, म्हणाला...
Pratyusha Banerjee case: 'बालिका वधू' फेम अभिनेत्रीनं उचललं टोकाचं पाऊल; आई - वडिलांचा बॉयफ्रेंडवर संशय, प्रत्युषा बॅनर्जी प्रकरणात कोर्टात मोठा ट्विस्ट
'बालिका वधू' फेम अभिनेत्रीनं उचललं टोकाचं पाऊल; आई - वडिलांचा बॉयफ्रेंडवर संशय, प्रत्युषा बॅनर्जी प्रकरणात कोर्टात मोठा ट्विस्ट
Kubbra Sait Defends Govinda Komal Rani Swarnkar: 'एखादी मुलगी एखाद्या अभिनेत्याच्या आसपास...'; गोविंदा, कोमल राणी स्वर्णकारच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओवर प्रसिद्ध अभिनेत्री भडकली, काय म्हणाली?
'एखादी मुलगी एखाद्या अभिनेत्याच्या आसपास...'; गोविंदा, कोमल राणी स्वर्णकारच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओवर प्रसिद्ध अभिनेत्री भडकली, काय म्हणाली?
Amitabh Bachchan Knee Injury on KBC Set: KBCच्या सेटवर बिग बींसोबत भयंकर घडलं; स्टेजवर पाय घसरुन पडले, गुडघ्यांना गंभीर दुखापत, तरीही म्हणाले Show Must go on...
KBCच्या सेटवर बिग बींसोबत भयंकर घडलं; स्टेजवर पाय घसरुन पडले, गुडघ्यांना गंभीर दुखापत, तरीही म्हणाले Show Must go on...

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
Mundhwa land deal case : 1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
Maharashtra MLC Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
Gold Silver Rate Today: दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी 'जैसे थे' जाणून घ्या ताजे भाव
दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी 'जैसे थे' जाणून घ्या ताजे भाव
‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरुन चौफेर टीका; आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा, स्पष्टीकरण देताना सांगितली भावना
‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरुन चौफेर टीका; आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा, स्पष्टीकरण देताना सांगितली भावना
Thane Crime Pradeep Purnekar death: पप्या तू त्याचा मित्र होतास ना, एकाच ताटात जेवलास अन्... प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा आक्रोश, सगळ्यांना गहिवरुन आलं
पप्या तू त्याचा मित्र होतास ना, एकाच ताटात जेवलास अन्... प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा आक्रोश, सगळ्यांना गहिवरुन आलं
Uddhav Thackeray and Pradeep Purnekar: उद्धव ठाकरे प्रदीप पूर्णेकरांच्या घरी पोहोचले, घरात पाऊल ठेवताच कुटुंब हळहळलं, पत्नी म्हणाली, 'आज त्यांना आनंद झाला असता'
उद्धव ठाकरे प्रदीप पूर्णेकरांच्या घरी पोहोचले, घरात पाऊल ठेवताच कुटुंब हळहळलं, पत्नी म्हणाली, 'आज त्यांना आनंद झाला असता'
Embed widget