मुंबई : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. अशातच अनेक महिने चित्रपटगृहही बंद होती. अशातच आता अनलॉकमध्ये चित्रपटगृह अटी-शर्थींसह सुरु करण्यास परवानगी दिल्यानंतर देशभरातील चित्रपटगृह सुरु करण्यात आली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनच्या या काळात चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणारा पहिला चित्रपट ठरला तो म्हणजे, मनोज बाजपेयी, फातिमा सना शेख आणि दिलजीत दोसांझ स्टारर चित्रपट 'सूरज पे मंगल भारी'.
रिलीजनंतर या चित्रपटांना जरी चांगला रिस्पॉन्स मिळत नसला, तरिही सुपरस्टार आमिर खानने हा चित्रपट मुंबईतील एका चित्रपटगृहात जाऊन पाहिला आहे. असं केल्यामुळे अमिर खान कोरोना काळात चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणारा पहिला बॉलिवूड स्टार बनला आहे.
विशेष बाब म्हणजे, आमिर खान चित्रपट पाहण्यासाठी एकटा गेला नव्हता, तर त्याच्यासोबत त्यांची मुलगी इराही होती. यानिमित्ताने दोघांनीही चेहऱ्यावर मास्क वेअर केले होते. मुंबईतीली पीव्हीआर थिएटरमध्ये आपली मुलगी इरा खानसोबत 'सूरज पे मंगल भारी' हा चित्रपट पाहण्यासाठी आमिर खानने चित्रपटाचं कौतुक करताना म्हणाला की, 'चित्रपट मनोरंजन करणारा होता. चित्रपटाचा सेकंड हाफ खूप चांगला आहे. मला अन्नू कपूर यांचं काम फार आवडलं. चित्रपटात सर्व कलाकारांनी चांगलं काम केलं आहे. मनोज बाजपेयी, फातिमा सना शेख, दिलजीत सर्वांचं काम चांगलं आहे. मी खूप खूश आहे की, मला इतक्या दिवसांनी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याचा आनंद अनुभवता आला.'
दरम्यान, चित्रपट पाहिल्यानंतर आमिर खानने स्वतः ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली होती की, तो थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी जाणार आहे. त्याने ट्वीटमध्ये लिहिलं होतं की, 'मी सिनेमा हॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी निघालो आहे. बर्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याचा अनुभव घेण्यासाठी मी उत्साही आहे.'
दिवाळीनंतर म्हणजेच, 15 नोव्हेंबर रोजी 'सूरज पे मंगल भारी' चित्रपट देशभरात रिलीज करण्यात आला. चित्रपट रिलीज करण्यापूर्वी तीन दिवस अगोदर या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंगही ठेवण्यात आली होती. ज्याच्या रेड कार्पेटवर अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
महत्त्वाच्या बातम्या :