Jailer Gadar 2 OMG 2 Movies Box Office Collection : 15 ऑगस्ट 2023 (Independence Day 2023) हा दिवस मनोरंजनसृष्टीसाठी खूपच चांगला होता. या स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर दाक्षिणात्य सुपरस्टार थलायवा रजनीकांत (Rajinikanth) यांचा 'जेलर' (Jailer), सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) आणि अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'ओएमजी 2' (OMG 2) हे सिनेमे प्रदर्शित झाले. या तिन्ही सिनेमांनी प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देण्यासोबत बॉक्स ऑफिसलाही सुगीचे दिवस दाखवले आहेत. 


कोरोनानंतर प्रेक्षकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमे पाहायला पसंती दर्शवली होती. पण आता कोरोनानंतर पुन्हा एकदा 15 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात टाळ्या, शिट्ट्यांच्या जल्लोषात 'जेलर' (Jailer), 'गदर 2' (Gadar 2) आणि 'ओएमजी 2' (OMG 2) हे सिनेमे पाहिले गेले. या तिन्ही भारतीय सिनेमांची रेकॉर्डब्रेक कमाई करत इतिहास रचला आहे. स्वातंत्र्यदिनी भारतीय सिनेप्रेक्षकांनी तब्बल 140 कोटींचा गल्ला (Box Office Collection) जमवला आहे.


'जेलर', 'गदर 2' आणि 'ओएमजी 2' हे तिन्ही सिनेमे पाहायला प्रेक्षकांनी सिनेमागृहात चांगलीच गर्दी केली होती. बऱ्याच दिवसांनी अनेक सिनेमागृहात हाऊसफुल्लचे बोर्ड झळकले. रजनीकांत आणि सनी देओलच्या प्रेमापोटी प्रेक्षकांनी त्यांचे सिनेमे पाहिले. राष्ट्रगीत 'जन गण मन' म्हणताना कधीच ऐकला नाही एवढा मोठा आवाज थिएटरमधून येत होता. 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणाही प्रेक्षकांनी जोरजोरात दिल्या. 






'जेलर', 'गदर 2' आणि 'ओएमजी 2' हे सिनेमे पाहायला प्रेक्षक मोठ्या संख्येने सिनेमागृहात गेले असले तरी सिनेमागृहातून बाहेर पडताना त्यांच्या चेहऱ्यावर निराशा नव्हती. त्यामुळे एकंदरीतच या तिन्ही सिनेमांनी प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. 'गदर 2' आणि 'ओएमजी 2' हे दोन्ही सिनेमे सीक्वेल असल्यामुळे या सिनेमांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. चांगलं कथानक, उत्तम कलाकार, उत्कृष्ट मांडणी, कमाल दिग्दर्शन यामुळे हे तिन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरले. 


स्वातंत्र्यदिनी बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ


रजनीकांतच्या (Rajinikanth) 'जेलर' (Jailer) या सिनेमाने 15 ऑगस्टला भारतीय बॉक्स ऑफिसवर (Jailer Box Office Collection) 33 कोटींची कमाई केली आहे. तर आतापर्यंत या सिनेमाने भारतात 207.15 कोटींची कमाई केली असून जगभरात 230 कोटींचा गल्ला जमवला आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) अभिनित 'ओएमजी 2' (OMG 2 Box Office Collection) या सिनेमाने स्वातंत्र्यदिनी 18.50 कोटींची कमाई केली आहे. तर आतापर्यंत या सिनेमाने भारतात 73.67 कोटींचं कलेक्शन जमवलं आहे. 


रजनीकांतवर भारी पडला सनी देओल


सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Ameesha Patel) यांच्या 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमाने 15 ऑगस्टला भारतीय बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. या सिनेमाने स्वातंत्र्यदिनी तब्बल 55.5 कोटींचा गल्ला जमवला आहे. रिलीजच्या पाचव्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा 'गदर 2' (Gadar 2 Box Office Collection) हा सिनेमा ठरला आहे. आतापर्यंत या सिनेमाने 229.08 कोटींची कमाई केली आहे. 'गदर : एक प्रेम कथा' हा सिनेमा 2001 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यावेळी आमिर खानचा (Aamir Khan) 'लगान' (Lagaan) हा सिनेमाही प्रदर्शित झाला होता. त्यावेळी 'गदर' आणि 'लगान' हे दोन्ही सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती. यंदाही 'गदर 2', 'जेलर' आणि 'ओएमजी 2' हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर आमने-सामने आहेत. पण तरीही तिन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. 


संबंधित बातम्या


Box Office : थिएटरमधल्या गर्दीने 100 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; तीन दिवसांत दोन कोटींपेक्षा अधिक लोकांनी पाहिला 'जेलर','गदर 2' अन् 'OMG 2'