एक्स्प्लोर

Aarya Season 3 Teaser: "जिसके सर पर ताज होता है, निशाना भी उसी पर होता है"; सुष्मिता सेनच्या आर्या-3 चा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज

Aarya Season 3 Teaser: आर्या-3 या वेब सीरिजचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमध्ये सुष्मिता ही अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे.

Aarya Season 3 Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनच्या (Sushmita Sen) आर्या-3 (Aarya 3) या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आर्या-3 या वेब सीरिजचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमध्ये सुष्मिता ही अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे.

आर्या-3 या वेब सीरिजच्या सुरुवातीला सुष्मितावर कोणीतरी गोळी झाडलेली दिसत आहे. त्यानंतर सुष्मिता जमिनीवर कोसळते. 'जिस कहानी की शुरुआत मेरे हाथ में नहीं थी। उसका अंत मुझे ही करना था पर वो अंत ऐसा होगा मैंने सोचा नहीं था।' हा सुष्मिताचा डायलॉग आर्या-3 या वेब सीरिजच्या टीझरमध्ये दिसतो. आर्या-3 या वेब सीरिजच्या टीझरमध्ये अभिनेता सिकंदर खेरची झलक देखील बघायला मिळत आहे. 

सुष्मिता सेननं सोशल मीडियावर आर्या-3 या वेब सीरिजचा टीझर शेअर केला आहे. या टीझरला तिनं कॅप्शन दिलं,  "जिसके सर पर ताज होता है, निशाना भी उसी पर होता है" सुष्मितानं शेअर केलेल्या टीझरवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

आर्या-3 या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. ही वेब सीरिज  3 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  ही  सीरिज Disney Plus Hotstar  या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक पाहू शकतात. आर्या ही वेब सीरिज आर्या सरीन या महिलेच्या आयुष्यावर आधारित आहे. आर्या-3 या वेब सीरिजमध्ये सुष्मिता सेनच्या मुलीची भूमिका वीरती वाघानीनं साकारली आहे आणि  मुलाची भूमिका विरेन वझिरानीनं साकारली आहे.

पाहा टीझर

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

आर्या या सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या सीझनमध्ये सुष्मितासोबतच  चंद्रचूर सिंह, नमित दास, अंकुर भाटिया  आणि विकास कुमार या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता प्रेक्षक आर्या-3 ची उत्सुकतेने वाट बघत आहेत. सुष्मिताची ताली ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी रिलीज झाली. या वेब सीरिजचं अनेकांनी कौतुक केलं.

इतर महत्वाच्या बातम्या:

Aarya 3: 'शेरनी के लौटने का वक्त आ गया है'; सुष्मिताच्या आर्या-3 वेब सीरिजची रिलीज डेट जाहीर

 

महत्त्वाच्या बातम्या

Actress Divya Suresh Faces Harassment In Bengaluru: प्रसिद्ध अभिनेत्री अन् तिच्या बहिणीसोबत मध्यरात्री घडला भयंकर प्रकार; दोघींना पाहून रस्त्यावरच्या माणसाचं किळसवाणं कृत्य, नको नको तिथे स्पर्श करुन...
प्रसिद्ध अभिनेत्री अन् तिच्या बहिणीसोबत मध्यरात्री घडला भयंकर प्रकार; दोघींना पाहून रस्त्यावरच्या माणसाचं किळसवाणं कृत्य, नको नको तिथे स्पर्श करुन...
Shraddha Kapoor Eetha: 'ईठा' सिनेमात 'द केरळ स्टोरी 2' फेम अभिनेत्रीची एन्ट्री; श्रद्धा कपूरसोबत नृत्याचा जलवा दाखवणार, कोण आहे ती?
'ईठा' सिनेमात 'द केरळ स्टोरी 2' फेम अभिनेत्रीची एन्ट्री; श्रद्धा कपूरसोबत नृत्याचा जलवा दाखवणार, कोण आहे ती?
Urfi Javed Screenshots: 'हॉट'स्टार उर्फी जावेदनं धर्म बदलला? रिता भारद्वाज असं नाव ठेवलं? अखेर सत्य समोर, स्क्रिनशॉट्स शेअर करत म्हणाली..
'हॉट'स्टार उर्फी जावेदनं धर्म बदलला? रिता भारद्वाज असं नाव ठेवलं? अखेर सत्य समोर, स्क्रिनशॉट्स शेअर करत म्हणाली..
Shreyas Talpade On Shah Rukh Khan: श्रेयस तळपदेला मिळत नव्हतं होम लोन, शाहरुख खानची एक सही अन् बँकेची मंजुरी, फराह खाननंही केलेला फोन
श्रेयस तळपदेला मिळत नव्हतं होम लोन, शाहरुख खानची एक सही अन् बँकेची मंजुरी, फराह खाननंही केलेला फोन

व्हिडीओ

Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'देशात जन्मलेलं प्रत्येक मूल अमेरिकन नागरिक..' अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व कायदा कायम, सुप्रीम कोर्टाकडून ट्रम्पचा आदेश रद्द, लाखो भारतीयांना दिलासा
'देशात जन्मलेलं प्रत्येक मूल अमेरिकन नागरिक..' अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व कायदा कायम, सुप्रीम कोर्टाकडून ट्रम्पचा आदेश रद्द, लाखो भारतीयांना दिलासा
Nashik Crime: वर्षभरापूर्वी विवाह केलेल्या पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून पतीकडून आयुष्याचा शेवट, 'त्या' पत्नीला अटक करा अन्यथा आत्मदहन करू; मयत पतीच्या कुटुंबियांचा इशारा, मालेगावातील घटनेनं खळबळ
वर्षभरापूर्वी विवाह केलेल्या पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून पतीकडून आयुष्याचा शेवट, 'त्या' पत्नीला अटक करा अन्यथा आत्मदहन करू; मयत पतीच्या कुटुंबियांचा इशारा, मालेगावातील घटनेनं खळबळ
LPG Gas price: मोठी बातमी: व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात, 183 रुपयांची घसघशीत कपात, नवा दर किती?
मोठी बातमी: व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात, 183 रुपयांची घसघशीत कपात, नवा दर किती?
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर स्लिपर बस आणि ट्रकच्या भीषण धडकेत सहा जणांचा जिवंतपणी जळून कोळसा; 8 जणांचा मृत्यू, 21 जण होरपळले, डिकीत सिगारेट बॉक्स असल्याचा दावा
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर स्लिपर बस आणि ट्रकच्या भीषण धडकेत सहा जणांचा जिवंतपणी जळून कोळसा; 8 जणांचा मृत्यू, 21 जण होरपळले, डिकीत सिगारेट बॉक्स असल्याचा दावा
Maharashtra Live blog updates: हार्बर रेल्वेमार्गावर ओव्हरहेड वायर तुटली, लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत
Maharashtra Live blog updates: हार्बर रेल्वेमार्गावर ओव्हरहेड वायर तुटली, लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत
Maharashtra Mumbai Rain Updates: मुंबईसह कोकणाला पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट; राज्यातही पावसाचा जोर वाढणार, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
मुंबईसह कोकणाला पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट; राज्यातही पावसाचा जोर वाढणार, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
Goa Travel Restrictions : पावसात गोव्याला जाताय? पर्यटकांनी पाण्यात उतरल्यास थेट तुरुंगात जावं लागणार, कडक नियम लागू
पावसात गोव्याला जाताय? पर्यटकांनी पाण्यात उतरल्यास थेट तुरुंगात जावं लागणार, कडक नियम लागू
सावकारी परवान्यासाठी घेतली 13 हजाराची लाच, सहाय्यक निबंधकासह तिघांना रंगेहात पकडलं, जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
सावकारी परवान्यासाठी घेतली 13 हजाराची लाच, सहाय्यक निबंधकासह तिघांना रंगेहात पकडलं, जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
Embed widget