Aishwarya Abhishek on Aradhya Bachchan :  मागील काही महिन्यांपासून बॉलिवूडचे शहेनशाह 'बिग बी' अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या कुटुंबात सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आता ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेकची मुलगी (Abhishek Bachchan) आणि अमिताभ-जया बच्चन (Jaya Bachchan) यांची लाडकी  नात आराध्या ही बच्चन कुटुंबियांपासून दूर राहणार असल्याचे वृत्त आहे. आराध्याबाबत ऐश्वर्या-अभिषेकने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.


बॉलिवूडमध्ये काही सेलिब्रिटींनी आपला ठसा उमटवला आहे. सुपरस्टार कलाकारांच्या घरात काय चाललंय हे जाणून घेण्याची चाहत्यांची इच्छा असते. बाॉलिवूडमधील काही  मोजक्या कुटुंबांबद्दल, त्यांच्या घरात काय सुरू आहे, हे जाणून घेण्याची इच्छा असते. अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाबाबत अशीच उत्सुकता असते. 


अमिताभ यांची लाडकी नात आराध्याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता असते. स्टार किड्समध्येदेखील आराध्या चर्चेत असते.






आराध्य बच्चन  आई-वडिलांसह परदेशात स्थायिक होणार?


वृत्तसंस्थानी दिलेल्या वृत्तानुसार, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी आराध्याच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वृत्तानुसार, आराध्या बच्चन ही आपल्या पुढील शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकते. त्यामुळेच ऐश्वर्याने यंदाची धुळवड आराध्यासाठी खास केली. आता, आराध्या पुढील काही वर्ष परदेशात असण्याची शक्यता आहे. 






सध्या आराध्या बच्चन मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहे. या परीक्षेनंतर आराध्या ही पुढील शैक्षणिक वर्षात दहावीत असेल.  त्यानंतर ती आपलं पुढील शिक्षण हे लंडन किंवा न्यूयॉर्कमध्ये घेणार असल्याची शक्यता आहे. 


आराध्या बच्चनचे वय किती आहे?


20 एप्रिल 2007 रोजी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न झाले. 16 नोव्हेंबर 2011 रोजी ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन यांना कन्यारत्न झाले. आराध्या तिच्या आजोबा आणि आजीची लाडकी आहे.  


इतर संबंधित बातमी: