मुंबई : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमीर खानची कन्या इरा सोशल मीडियावरील फोटोंमुळे अनेकदा चर्चेचा विषय ठरत असते. यावेळी इराने एका तरुणासोबत फोटो शेअर केल्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. फोटोमध्ये दिसणारा तरुण इराचा बॉयफ्रेण्ड आहे का, असा प्रश्न अनेक जणांनी कमेंटच्या स्वरुपात विचारला आहे.


इराने इन्स्टाग्रामवर तीन फोटो पोस्ट केले आहेत. कॅलिफोर्नियातील सांता बार्बरामधले हे फोटो आहेत. 'तुमची सुट्टी मिशालसारखीच हसरी गेली असेल, अशी आशा.' असं कॅप्शन देताना तिने तीन बदामही जोडले आहेत.

या फोटोमध्ये इरासोबत दिसणारा तरुण आहे मिशाल कृपलानी. दोन फोटोंमध्ये इरा मिशालसोबत बसलेली आहे, मात्र तिसरा फोटो अनेकांची उत्सुकता वाढवणारा आहे. कारण यामध्ये मिशाल इराच्या कपाळावर किस करताना दिसत आहे.

शॉर्ट्स घातल्याने आमीरची मुलगी इरा पुन्हा ट्रोल

मिशाल एक कलाकार आहे. तो संगीतकार म्हणून नावारुपास येत आहे. मिशालने आपल्या काही कलाकृती इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्या आहेत. आता इरा आणि मिशालमध्ये काही शिजतंय का, हे इतक्यात सांगता येत नाही.


इराला चित्रपट निर्मितीमध्ये रस असल्याचं आमीरने सांगितलं होतं. सध्या तिचं शिक्षण सुरु आहे. यापूर्वी कमी कपडे घालून सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्याबद्दल इराला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आमीर खानसोबतच्या एका फोटोमुळेही तिला समाजात टीकेची धनी व्हावं लागलं होतं.