नवी दिल्ली : आमिर खान सध्या आपला आगामी चित्रपट 'लाल सिंह चड्ढाच्या शुटिंगसाठी तुर्कीमध्ये गेला आहे. तिथे तो आपल्या आगामी चित्रपटाचं शुंटिंग करणार आहे. काही दिवसांपूर्वी तुर्कीतून त्याचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये तो तुर्कीच्या राष्ट्रपतींच्या पत्नी एमीन एर्दोगनसोबत दिसून आला आहे. या फोटोवरून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे.
आमीर खानसोबतचे फोटो एमीन एद्रोगनने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहे. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, 'मला जगप्रसिद्ध अभिनेते आमिर खान यांना भेटण्याची सुवर्णसंधी मिळाली. फिल्ममेकर आणि दिग्दर्शक इस्तानबुलमध्ये आहेत. मला हे जाणून घेऊन आनंद होत आहे की, आमिर लवकरच आपला आगमी चित्रपट 'लाल सिंह चड्ढा'चं शुटिंग तुर्कीतील वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण करतील.'
तुर्कीच्या राष्ट्रपतींच्या पत्नी एमीन एर्दोगनसोबतच्या फोटोंमुळे आमिर खान ट्रोल
आमिर खान आपल्या या फोटोंमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. दरम्यान, आमिरवर होत असलेल्या ट्रोलिंगसाठी आमिरची काहीही चूक नाही. खरं तर जम्मू-काश्मिरमधून कलम 370 रद्द करण्यात आलं आहे. हे कलम हटवल्याचा विरोध करणाऱ्या देशांमध्ये तुर्कीचा समावेश आहे. त्यामुळेच आमिर खान सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
जम्मू-काश्मिरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर तुर्कीने या निर्णयाचा विरोध केला होता. तसेच काही दिवसांपूर्वी हागिया सोफिया म्युझियनला पुन्हा मशीद बनवण्याच्या मुद्द्यावरून तुर्कीने संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे वेधलं होतं. एमीन अर्दोआन ज्यांची आमिर खानने भेट घेतली त्या नेहमी हिजाब घालतात. परंतु, तुर्कीमध्ये हिजाबवर बंदी होती. हिजाब घालून मुली युनिवर्सिटीत जाऊ शकत नव्हत्या. परंतु, अर्दोआन यांच्या पत्नी हिजाबमुळेच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नव्हत्या. काही लोक आमिरला या कारणामुळेही ट्रोल करत आहेत.
तसेच आमिर खान भारतात असहिष्णुता असल्याच्या आपल्या जुन्या वक्तव्यामुळेही ट्रोल होत आहे. तसेच पीकेमध्ये हिंदु धर्माची चेष्ठा केल्याचाही आमिरवर आरोप लावण्यात येत आहे.
कपिल मिश्राने ट्वीट केलं की, 'यांना भारतात भिती वाटते.'
सुब्रमण्यम स्वामी यांनीही ट्वीट करत आमीर खानवर निशाणा साधला आहे. ते ट्वीट करत म्हणाले की, 'म्हणजे हे सिद्ध झालं की, आमिर खानही तिनही खानांपैकी एक आहेत.'
अभिनव खेरे यांनी ट्वीट केलं की, 'जेव्हा याचा चित्रपट रिलीज होईल त्यावेळी हा फोटो लक्षात ठेवा. आपले पैसे आपल्याच विरोधात वापरले जाऊ देऊ नका.'
हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक 'लाल सिंह चड्ढा'
आगामी चित्रपट 'लाल सिंह चड्ढा'मध्ये अभिनेत्री करीना कपूर लीड रोलमध्ये दिसून येणार आहे. याव्यतिरिक्त दक्षिण भारतीय चित्रपटांचे सुपरस्टार विजय सेतुपति देखील एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटात मोना सिंह देखील असणार आहे. 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट अद्वैत चंदन दिग्दर्शित करणार आहेत. ज्यांनी याआधी 'सिक्रेट सुपरस्टार' हा चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.
दरम्यान, 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाची निर्मिती स्वतः आमिर खान करत आहे. हा चित्रपट 1994मध्ये आलेल्या हॉलिवूडमधील ब्लॉकबस्टर चित्रपट 'फॉरेस्ट गम्प'चं रिमेक असणार आहे. ज्यामध्ये टॉम हँक्स होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
बॉलिवूडमधला मराठमोळा दिग्दर्शक हरपला, दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन
संजय दत्त पुन्हा एकदा लीलावती रुग्णालयात दाखल, टेस्ट झाल्यानंतर डिस्चार्ज