Ira Khan And Nupur Shikhare Wedding: अभिनेता  आमिर खानची (Aamir Khan) मुलगी  आयरा खान (Ira Khan) आणि नुपूर शिखरे (Nupur Shikhare) हे आज लग्न करणार आहेत. नुपूर आणि आयराच्या प्री-वेडिंग फंक्शनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशताच सध्या नुपूरच्या हटके वरातीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. आमिर खानचा होणारा जावई  टी-शर्ट आणि हाफ पॅन्टमध्ये लग्नाच्या वरातीत सामील झाला आहे. तो वेडिंग वेन्यूपर्यंत जॉगिंग करत आला, असं म्हटलं जात आहे.


आमिरच्या होणाऱ्या जावयाची हटके वरात


मुंबईच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये आयरा आणि नुपूर लग्नगाठ बांधणार आहेत. नुपूर हा शॉर्ट, ब्लॅक टीशर्ट आणि स्पॉर्ट्स शूज अशा लूकमध्ये धावत वेडिंग वेन्यू पर्यंत पोहोचला आहे. वेडिंग वेन्यूच्या गेटवर नुपूरनं त्याच्या कुटुंबासोबत देखील डान्स केला.  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तो ढोलाच्या तालावर थिरकताना दिसला. नुपूरच्या या हटके वरातीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


नुपूर शिखरेने वेडिंग वेन्यूच्या गेटबाहेर ढोल-ताशांच्या तालावर डान्स केला. नुपूरला डान्स करताना पाहिल्यानंतर त्याचे कुटुंबीय आणि मित्रमंडळीही वरातीत सामील झाले. जवळपास 10 मिनिटे नुपूर त्याच्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रमंडळींसोबत डान्स करताना दिसला.


पाहा व्हिडीओ:






आज आमिरची मुलगी आयरा आणि नुपूर यांचे  रजिस्टर्ड मॅरिज होणार आहे. त्यानंतर ते उदयपूरला रवाना होतीस, जिथे दोघांचे भव्य लग्न होणार आहे. या जोडप्याचा शाही विवाह 8 जानेवारीला होणार आहे, असं म्हटलं जात आहे. 


आयराचा होणारा पती नुपुर शिखरेचा जन्म 17 ऑक्टोबर 1985 रोजी पुण्यात झाला आहे. नुपुर हा एक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे. तो वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो. आयरा आणि नुपूर यांची गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एंगेजमेंट झाली होती. त्यांच्या  एंगेजमेंटचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.आयरा खानच्या एंगेजमेंटसाठी सोहळ्याला संपूर्ण खान कुटुंबीय उपस्थित होते. आता आयरा आण  नुपूर लग्नबंधनात अडणार आहेत.
 


महत्वाच्या बातम्या : 


Ira Khan-Nupur Shikhare Wedding: सलमानच्या घरी पार पडला आमिरच्या लेकीचा मेहंदी सोहळा; मुलीच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये स्टायलिश अंदाजात पोहोचला आमिर