Ira Khan-Nupur Shikhare Wedding: अभिनेता आमिर खानची (Aamir khan) मुलगी आयरा खान (Ira Khan) ही तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. काल सलमान खानने (Salman khan) त्याच्या घरी आमिरच्या लाडक्या लेकीचा मेहंदीचा कार्यक्रम आयोजित केला होता. मंगळवारी, आमिर खान, त्याचा मुलगा जुनैद, आझाद आणि एक्स वाईफ रीना दत्ता आणि किरण राव यांच्यासह सलमान खानच्या घरी मुलीच्या मेहेंदी सोहळ्यामध्ये सहभागी झाला.
गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पार पडला आयराचा मेहंदी सोहळा
सलमान खानने मंगळवारी (2 जानेवारी) रात्री आमिर खानची मुलगी आयरा खानच्या मेहंदी सोहळ्याचे आयोजन गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये केले होते. यावेळी सलमान खानचे घर लाइट्सनं सजलेले होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आमिर खान हा मुलगा जुनैदसोबत सलमान खानच्या घरी जाताना दिसत आहे. लेकीच्या मेहंदी सोहळ्यासाठी आमिरनं स्टायलिश लूक केला होता. आमिर खानने काळ्या टी-शर्ट आणि बेज रंगाची पँट असा लूक केला होता.
आयरा खानचा हळदी सोहळा मंगळवारी दुपारी पार पडला. या सोहळ्याला आमिर खानच्या एक्सा वाईफ्स पत्नी किरण राव आणि रीना दत्ता या दोन्ही मराठमोळ्या लूकमध्ये दिसल्या.
आमिर खानची मुलगी आयरा खान ही आज तिची बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत विवाहबंधनात अडकणार आहे, असं म्हटलं जात आहे. आयरा आणि नुपूर शिखरे हे मुंबईत लग्न करणार आहेत. यानंतर ते दोघे फॅमिलीसोबत रिसेप्शन पार्टी करणार आहे. आमिर बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी आपल्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीचे आयोजन करेल ज्यामध्ये सलमान खान, शाहरुख खान आणि अनेक बडे स्टार्स उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
आयराचा होणारा पती नुपुर शिखरेचा जन्म 17 ऑक्टोबर 1985 रोजी पुण्यात झाला आहे. नुपुर हा एक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे. आयरा आणि नुपूर दोघेही 2020 पासून एकमेकांना डेट करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :