Ira Khan And Nupur Shikhare:  आमिर खानची (Aamir Khan) लेक आयरा खान (Ira Khan)  ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या केळवण कार्यक्रमाचे फोटो  सोशल मीडियावर शेअर करत आहेत. आयरा ही  मराठमोळा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare)  लवकरच  लग्नगाठ बांधणार आहे. नुकतेच आयरानं तिच्या केळवण कार्यक्रमाचे काही खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामधील एका व्हिडीओमध्ये आयरा ही खास उखाणा घेताना दिसत आहे.


आयराचा खास उखाणा


आयरानं काही दिवासांपूर्वी शेअर केलेल्या केळवण कार्यक्रमाच्या व्हिडीओमध्ये तिनं "मला मराठी येत नाही पण पॉपोयसाठी मी कधी नाही म्हणत नाही" हा खास उखाणा घेतला होता. आता आयरानं तिच्या दुसऱ्या केळवण कार्यक्रमामध्ये देखील खास उखाणा घेतला आहे. ती म्हणाली,"आता मला मराठी येते आणि मी पॉपोयला घेऊन जाते."


लूकनं वेधलं लक्ष!


सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओला आयरानं कॅप्शन दिलं, "केळवण 2! उखाणा 2! मी त्याच्यावर खूप प्रेम करतो." या फोटोमध्ये आयरा ही नऊवारी साडी, नाकात नथ आणि खास दागिने अशा लूकमध्ये दिसत आहे.


पाहा व्हिडीओ






आमिरनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, आयराचे लग्न हे 3 जानेवारीला होत आहे. आयरा खान ही फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत 3 जानेवारीला कोर्ट मॅरेज करणार आहे. त्यानंतर त्यांचा लग्नसोहळा राजस्थानमधील उदयपूर येथे होणार आहे. तसेच 13 जानेवारी रोजी मुंबईत आयराचे ग्रँड वेडिंग रिसेप्शन होणार आहे, असे म्हटले जात आहे.


कोण आहे आयराचा होणारा पती?


आयराचा होणारा पती नुपूर हा  फिटनेस ट्रेनर आहे. नुपूर हा त्याचे वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. आयरा आणि नुपूर दोघेही 2020 पासून एकमेकांना डेट करत आहेत. आयरा आणि नुपूर यांची गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एंगेजमेंट झाली होती. आयरा खानच्या एंगेजमेंटसाठी सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आता आयरा आणि नुपूर हे लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. 


महत्वाच्या बातम्या : 


Ira khan Kelvan: थाटात पार पडलं आमिर खानच्या लेकीचं केळवण; आयरानं घेतला उखाणा, म्हणाली, "मला मराठी येत नाही पण..."