Aadesh Bandekar : "दार उघड बये, दार उघड..." म्हणत महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेले लाडके भाऊजी अर्थात आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) यांची प्यारवाली लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) म्हणत आदेश-सुचित्रा यांनी पळून जाऊन लग्न केलं. आज आदेश-सुचित्रा यांचा सुखी संसार सुरू आहे. 'होम मिनिस्टर' (Home Minister) या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकरांनी महाराष्ट्रातील घराघरांतील वहिनींना पैठणीची भेट दिली आहे. पण खऱ्या आयुष्यात बांदेकरांनी घरच्या 'होम मिनिस्टर'ला अर्थात सुचित्रा बांदेकर यांना किती पैठण्या दिल्या आहेत? असा प्रश्न चाहत्यांना पडला असून नुकत्याच एका मुलाखतीत लाडक्या भाऊजींनी याबद्दल खुलासा केला आहे. 


आदेश बांदेकर यांना 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगलाच ब्रेक मिळाला आहे. आजही अनेक घरांमध्ये दररोज सायंकाळी हा कार्यक्रम न चुकता पाहिला जातो.  20 वर्षांनंतरही या कार्यक्रमाची चांगलीच क्रेझ आहे. 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाला आता 20 वर्षांपेक्षा अधिक दिवस झाले असून या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची धुरा आदेश बांदेकर सांभाळत आहेत. 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण पैठणी आहे. 


आदेश बांदेकरांनी 20 वर्षांत बायकोला किती पैठण्या दिल्या? 


महाराष्ट्राचं देखणं महावस्त्र म्हणजे पैठणी आहे. महिला आणि पैठणी हे एक वेगळच समीकरण आहे. आदेश बांदेकर यांनी नुकतचं 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी 'होम मिनिस्टर' या सुपरहिट कार्यक्रमातील अनेक किस्से शेअर केले. दरम्यान त्यांना गेल्या 20 वर्षांत सुचित्रा बांदेकर यांना किती पैठण्या दिल्या? असा प्रश्न विचारण्यात आला. बांदेकर म्हणाले,"आता मी सुचित्रासाठी साड्या विकत घेत नाही. आता साडी खरेदी करून मला फक्त बिल आणून ती दाखवते. पैठणी साडीची ओळख महाराष्ट्रचं महावस्त्र अशी आहे. अशी पैठणी जेव्हा एखाद्या माऊलीच्या अंगावर जाते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे तेज आणि आनंद खूप जास्त असतो. असचं तेज माझ्याही घरात असावं असा मला वाटणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे सुरुवातीला मी स्वत: दुकानात जाऊन तिच्यासाठी एक-दोन पैठणी साड्या विकत घेतल्या. पण आता ती स्वत:चं साड्या खरेदी करते आणि नंतर मला आणून दाखवते". आदेश बांदेकरांच्या या उत्तराने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


आदेश बांदेकरांनी पत्नीला दिलेलं 'हे' वचन


आदेश बांदेकर पुढे म्हणाले,"आमचं लग्न झालं तेव्हा मी सुचित्राला काही देऊ शकत नव्हतो. पण त्यावेळी मी तिच्याकडे एक इच्छा व्यक्त केली होती. सुचित्राला मी म्हणालो होतो,"प्रामाणिकपणाच्या जोरावर मी अशी परिस्थिती निर्माण करेल की कधीच तुला लेबल पाहून वस्तू विकत घ्यावी लागणार नाही". यासाठी मी 25 वर्षे मेहनत घेतील. आमच्या सुखी संसाराला आता 33 वर्षे पूर्ण झाली आहेत. एकदा स्वच्छ कामाचा मार्ग निवडला की पुन्हा मागे वळून पाहावे लागत नाही".


संबंधित बातम्या


Aadesh Bandekar Profile : नारळी पौर्णिमेला नारळ विकले, इलेक्ट्रिक तोरणांचा व्यवसाय, ढोलही वाजवले, लाडक्या आदेश भाऊजींचा 'होम मिनिस्टर'पर्यंतचा प्रवास