Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक नव-नवीन ट्विस्ट येत आहेत. त्यामुळेच ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत सध्या यश-नेहा आणि नेहा-परीमध्ये अविनाशमुळे दुरावा आला आहे. आता नेहा अविनाशला जाळ्यात अडकवणार आहे. 

Continues below advertisement

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत अविनाशने परीची कस्टडी मागितली आहे. नेहाने ही गोष्ट आता यशच्या कानावर घातली आहे. पण यशचा नेहावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे नेहाने यशला चाळीत बोलवलं आहे. आता नेहाच्या सांगण्यावरुन यश चाळीत नेहाला भेटायला जाणार का? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 

अविनाशमुळे नेहाच्या अडचणीत वाढ

अविनाशने कॅन्सर झाल्याचं खोटं नाटक करत पॅलेसवर नोकरी मिळवली आणि परीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवला आहे. दुसरीकडे परी आणि अविनाशची चांगली मैत्री झाली आहे. अशातच अविनाश तिचा खरा बाबा असल्याचं सत्य परीला कळालं आहे. त्यामुळे नेहाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Continues below advertisement

अविनाश कॅन्सर झाल्याचं खोटं नाटक करत असल्याचा नेहाला अंदाज आला आहे. त्यामुळे आता ती हे सत्य यशसमोर आणण्याचा निर्णय घेते. आता नेहा अविनाशला जाळ्यात अडकवणार असल्याने सिम्मीचं खरं रूपदेखील सर्वांसमोर येणार आहे. त्यामुळे आता सिम्मीलादेखील अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तर लवकरच यश-नेहा पुन्हा एकत्र येतील. 

'माझी तुझी रेशीमगाठ' लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'माझी तुझी रेशीमगाठ' प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने चाहते नाराज झाले आहेत. आता या मालिकेची जागा 'दार उघड बये' ही नवी मालिका घेणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो आऊट झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. 

संबंधित बातम्या

Mazhi Tuzhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; चाहते नाराज, म्हणाले...

Prarthana Behere : 'अभी ना जाओ छोडकर...'; नेहा कामत या व्यक्तिरेखेला निरोप देताना प्रार्थना बेहेरे भावूक