69 National Film Awards Godavari Movie Director Nikhil Mahajan : सिनेसृष्टीतील मानाच्या 69 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याची (69 National Film Award) घोषणा झाली आहे. या पुरस्कार सोहळ्यात मराठी सिनेमांनी बाजी मारली आहे. आघाडीचा सिने-दिग्दर्शक निखिल महाजन (Nikhil Mahajan) याला 'गोदावरी' (Godavari) या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याआधी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्येही 'गोदावरी' सिनेमाला गौरवण्यात आले आहे. 


'गोदावरी' या सिनेमाचं कथानक काय आहे? 


'गोदावरी' हा कौटुंबिक सिनेमा आहे. प्रत्येक कुटुंबाला जोडणारा असा हा सिनेमा आहे. नाशिकमध्ये राहणाऱ्या निशिकांतच्या हसत्याखेळत्या कुटुंबातील चढउतार तसेच परंपरा, रूढी आणि भावना यांचे सुंदर मिश्रण ‘गोदावरी’मध्ये दाखवण्यात आले आहे. नाशकातील गोदावरी नदी हा या सिनेमाचा मुख्य दुवा आहे. ‘गोदावरी’ नदीविषयी मनात कटुता असणाऱ्या निशिकांत आणि गोदावरीमध्ये नक्की काय संबंध आहे, हे कोडं प्रेक्षकांना सिनेमा पाहिल्यावर उलगडेल.


समीक्षकांनी नावाजलेला ‘गोदावरी’  जिओ सिनेमावर मोफत पाहा


अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गौरवण्यात आलेला निखिल महाजन यांचा ‘गोदावरी’ हा  सिनेमा जिओ सिनेमावर प्रेक्षक मोफत पाहू शकतात. 2021 मध्ये व्हँकुव्हर चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचे प्रदर्शन झाले. खिळवून ठेवणारी कथा आणि अप्रतिम अभिनयासाठी या सिनेमाचं खूप कौतुक होत आहे. 






तगडी स्टारकास्ट असलेला 'गोदावरी'


जितेंद्र जोशी, नीना कुलकर्णी, विक्रम गोखले, गौरी नलावडे, प्रियदर्शन जाधव आणि संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाची कथा नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठी राहणाऱ्या एका कुटुंबाभोवती फिरते. भावना, आव्हाने आणि मानवी नातेसंबंधांच्या नाजूक पदरांचा वेध हा सिनेमा सुंदररित्या घेतो.


नदीच्या रम्य पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या चित्रपटाची कथा निखिल महाजन व प्राजक्ता देशमुख यांची आहे. 2021 मध्ये व्हँकुव्हर चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचे प्रदर्शन झाले. खिळवून ठेवणारी कथा आणि अप्रतिम अभिनयासाठी या चित्रपटाचे तेथे खूप कौतुक झाले. प्रेक्षकांसह मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी या सिनेमाचं कौतुक करत आहेत. आता निखिल महाजनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाल्याने जितेंद्र जोशीने एक खास पोस्ट शेअर करत त्याचं अभिनंदन केलं आहे.


संबंधित बातम्या


Godavari: कसा आहे 'गोदावरी' चित्रपट? वाचा रिव्ह्यू