International Film Festival: हॉलिवूड स्टार मायकेल डग्लस (Michael Douglas) यांनी गोव्यातील  54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (IFFI) हजेरी लावली. यंदा इफ्फीमध्ये सत्यजित रे   लाइफटाइम  अचीवमेंट पुरस्कार  मायकेल डग्लस यांना प्रदान करण्यात आला. इफ्फीचा मंचावर मायकेल डग्लस यांनी आरआरआर (RRR) या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्यावर डान्स देखील केला. तसेच यावेळी मायकेल यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचे कौतुक देखील केलं.


चित्रपटसृष्टीबद्दल काय म्हणाले मायकेल डग्लस?


आरआरआर चित्रपटाबद्दल मायकेल डग्लस म्हणाले, 'हे विलक्षण होते, त्यांनी संगीतासाठी ऑस्कर जिंकले. ते आश्चर्यकारक होते. सध्या भारतीय चित्रपटसृष्टीसाठी खूप चांगला काळ आहे."


54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पत्रकार परिषदेत मायकेल डग्लस म्हणाले "या महोत्सवाचे सौंदर्य म्हणजे तुम्ही 78 परदेशी देशांचे प्रतिनिधित्व केले. मला वाटते की, भारत हा सध्या खूप चांगल्या हातात आहे."


"मला वाटतं की,  अनुराग ठाकूर आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांत  चित्रपटांच्या निर्मितीसाठी आणि वित्तपुरवठा करण्यासाठी अधिक पैसा लावण्यात येत आहे, हे आम्ही बघत आहोत.", असंही मायकेल डग्लस यांनी सांगितलं.


मायकेल डग्लस यांची पत्नी कॅथरीन झेटा-जोन्स आणि मुलगा डिलन डग्लस यांनी देखील 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावली होती. मायकेल डग्लस, कॅथरीन झेटा-जोन्स आणि डिलन डग्लस यांचे इफ्फीच्या रेड कार्पेटवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटो आणि व्हिडीओमध्ये मायकेल डग्लस हे   प्रिंटेड कोट आणि ब्लॅक गॉगल अशा लूकमध्ये दिसले तर कॅथरीन झेटा-जोन्स या ब्लू ड्रेसमध्ये दिसल्या.






जाणून घ्या मायकेल डग्लस यांच्या चित्रपटांबद्दल


'फॉलिंग डाउन', 'द अमेरिकन प्रेसिडेंट,' 'द घोस्ट अँड द डार्कनेस,' 'द गेम', 'अ परफेक्ट मर्डर' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मायकेल डग्लस यांनी काम केलं आहे. दोन अकादमी पुरस्कार, पाच गोल्डन ग्लोब पुरस्कार, एक प्राइमटाइम एमी पुरस्कार, सेसिल बी. डिमिल पुरस्कार आणि AFI लाइफ अचिव्हमेंट पुरस्कार या पुरस्कारांवर मायकेल डग्लस यांनी आपले नाव कोरले आहे.



संबंधित बातम्या:


Shahid Kapoor: इफ्फीमध्ये परफॉर्म करताना स्टेजवर अचानक कोसळला शाहिद; पुढे काय घडलं?