Shahid Kapoor:  54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (IFFI) उद्घाटन सोहळा सोमवारी गोव्यात पार पडला. या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. तसेच काही कलाकारांनी या सोहळ्यात परफॉर्म देखील केलं आहे.बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरनं (Shahid Kapoor) सोमवारी (20 नोव्हेंबर) गोव्यात आयोजित 54 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया 2023 (IFFI) च्या उद्घाटन सोहळ्यात परफॉर्म केलं. शाहिदच्या परफॉर्मन्सचा एक व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहिद परफॉर्म करताना अचानक स्टेजवर कोसळतो, असं दिसत आहे.


शाहिदने परफॉर्मन्स केला पूर्ण


व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शाहिदने  ब्लॅक आउटफिट - स्लीव्हलेस टी-शर्ट, पँट आणि सनग्लासेस असा लूक केला आहे. व्हिडीओमध्ये शाहिद डान्स करताना दिसत आहे. अशातच शाहिद डान्स करताना मागे वळतो तेव्हा अचानक त्याचा पाय घसरतो आणि तो खाली पडतो.  


पुढे काय घडलं?


पाय घसरुन स्टेजवर पडल्यानंतर शाहिद हा पटकन उठून परफॉर्मन्स पूर्ण करतो, त्यानंतर तो प्रेक्षकांकडे बघून हसतो, असं व्हिडीओमध्ये दिसत आहे. शाहिदचा परफॉर्मन्स पूर्ण झाल्यानंतर प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करतात.




प्रेक्षकांना दिली फ्लाईंग किस


परफॉर्मन्स पूर्ण झाल्यानंतर शाहिद सर्वांना फ्लाईंग किस देतो, असं व्हिडीओमध्ये दिसत आहे. इफ्फीमध्ये परफॉर्म करण्यापूर्वी शाहिदनं ANI सांगितलं होतं, "इफ्फीमध्ये आल्याने मी खूप आनंदी आहे आणि परफॉर्म करण्यास उत्सुक आहे. गोवा हे माझे आवडते ठिकाण आहे."






शाहिदचे चित्रपट


शाहिद हा देवा या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  हा चित्रपट 11 ऑक्टोबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात पूजा हेगडे देखील  महत्वाची भूमिका साकारणार आहे. तसेच शाहिद हा एका आगामी चित्रपटामध्ये क्रिती सॅननसोबत काम करणार आहे. या चित्रपटाच्या नावाची माहिती अजून देण्यात आलेली नाही.  शाहिदने इश्क-विश्क या  चित्रपटातून आपल्या अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. त्यानंतर या शाहिदनं  'जब वी मेट', 'हैदर', 'उडता पंजाब' यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. शाहिदच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


संबंधित बातम्या:


Mahesh Manjrekar : 'IFFI' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महेश मांजरेकरांच्या 'बटरफ्लाय'चा विशेष शो