एक्स्प्लोर

2.0 ची बक्कळ कमाई, बाहुबलीच्या लाईफटाईम कमाईचा टप्पा पार

या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 500 कोटींची कमाई केली होती तर दुसऱ्या आठवड्यात 700 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. 'बाहूबली द बिगिनिंग' या चित्रपटाच्या लाईफटाईम कमाईचा टप्पा पार केला आहे.

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा बिग बजेट चित्रपट '2.0' ची दुसऱ्या आठवड्यानंतर 700 कोटी रुपयांची विक्रमी कमाई झाली आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 500 कोटींची कमाई केली होती तर दुसऱ्या आठवड्यात 700 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. 'बाहूबली द बिगिनिंग' या चित्रपटाच्या लाईफटाईम कमाईचा टप्पा पार केला आहे. जागतिक कलेक्शनमध्ये पहिल्या आठवड्यात 2.0 या सिनेमाने 526.86 कोटी रुपयांची घवघवीत कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी 27.31 कोटी, दुसऱ्या दिवशी 32.57 कोटी, तिसऱ्या दिवशी 36.45 कोटी, चौथ्या दिवशी 39. 20 कोटी तर पाचव्या दिवशी 17.13 कोटी, सहाव्या आणि सातव्या दिवशी 31.46 कोटी रुपयांची कमाई केली आहे, अशी माहिती चित्रपट तज्ज्ञ विजयबाला यांनी ट्वीट करुन दिली. हिंदी व्हर्जनमध्ये 177.75 कोटींची कमाई चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ट्वीटरवर दिलेल्या माहितीनुसार 2.0 या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या आठवड्यात 139.75 कोटी रुपये कमावले होते. तर दुसऱ्या आठवड्यात 38 कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. हिंदी व्हर्जनची एकूण कमाई 177.75 कोटी रुपयांची झाली आहे. 2.0 चित्रपट गुरुवारी 29 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता, त्यामुळे पहिला आठवडा 8 दिवसांचा होता. रजनीकांतसह 2.0 मध्ये अक्षय कुमार, अॅमी जॅक्सन, आदिल हुसेन, आणि सुधांशु पांडे यांची प्रमुख भूमिका आहे. अक्षय कुमारचा हा पहिला दक्षिणात्य चित्रपट आहे. चित्रपटात अक्षयने खलनायकाची भूमिका साकारली आहे. तर रजनीकांत वैज्ञानिक आणि रोबोच्या भूमिकेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Narayani Shastri on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
Drishyam 3 Box Office: 'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
Lalit Prabhakar Sai Tamhankar Viral Photo: प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO
प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
Embed widget