Biggest Suspense Thriller Murder Mystery Film: हॉलिवूड (Hollywood) असो, बॉलिवूड (Bollywood) असो किंवा मग टॉलिवूड (Tollywood)... एकापेक्षा एक अशा सस्पेन्स, थ्रीलर चित्रपटांचा (Suspense Thriller Movie) भडिमार केला जातो. चित्रपटगृहांपासून ते अगदी ओटीटीपर्यंत (OTT) अनेक सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट तुम्हाला पाहायला मिळतील. पण, आज आम्ही तुम्हाला एका अशा चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो तब्बल 60 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला आणि हिट ठरला. हिंदी चित्रपटसृष्टीतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सस्पेन्स थ्रिलर मर्डर मिस्ट्री चित्रपट आहे, ज्याच्या समोर आजचे सर्व सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट तुलनेनं फिके आहेत. भल्या भल्या चित्रपटांसमोर हा सरस ठकतो.
सध्या ओटीटीवर दररोज नवनवे चित्रपट पाहायला मिळतात. ज्यामधला सस्पेन्स आणि थ्रील पाहून डोकं अगदी सुन्न होऊन जातं. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा चित्रपटाबाबत सांगणार आहोत, जो 60 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी हा चित्रपट रिलीज होताच, बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट झाला. या चित्रपटात मोठी स्टारकास्ट पाहायला मिळाली, ज्यांनी आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकलीच, पण बक्कळ कमाईसुद्धा केली.
बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट 1965 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजा नवाथे यांनी केलं होतं. मनोज कुमार, नंदा, मेहमूद, प्राण, हेलन, मदन पुरी, तरुण बोस, धुमल आणि मनमोहन यांसारखे कलाकार या चित्रपटात दिसले. 'गुमनाम' असं या चित्रपटाचं नाव. या चित्रपटाला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली. आजही हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. चित्रपटाच्या कथेसोबतच चित्रपटातील व्यक्तिरेखाही प्रचंड गाजल्या. या चित्रपटात मनोज कुमार यांनी पोलिसाची भूमिका साकारली आहे.
'गुमनाम' एक सस्पेन्सनं भरलेली मर्डर मिस्ट्री आहे. ज्यामध्ये तुम्हाला एक जबरदस्त थ्रिलसुद्धा पाहायला मिळेल. या चित्रपटाची कथा आठ जणांभोवती फिरते. जे एका बेटावर जाऊन तिथेच अडकतात. त्यानंतर ते सर्वजण एका जुन्या वाड्यात पोहोचतात, जिथे एक बटलर आधीच त्यांची वाट पाहत असतो. मग अचानक, त्या सर्वांचे एकापाठोपाठ एक खून होण्यास सुरुवात होते. पण खुनी कोण आहे, हे कोणालाच माहीत नाही. जसजसा चित्रपट पुढे जातो, सर्वांना हैराण करुन सोडतो. पण चित्रपटाचा क्लायमॅक्स तुम्हाला थक्क करेल.
राजा नवाथे दिग्दर्शित चित्रपटानं त्यावेळी 2.6 कोटींची कमाई केली होती. सस्पेन्ससोबतच तुम्हाला या चित्रपटात धमाकेदार थ्रिलर, ॲक्शन आणि रोमान्सही पाहायला मिळणार आहे. याशिवाय त्या काळातील विनोदी अभिनेता मेहमूद यानं आपल्या दमदार अभिनयानं रंगलेल्या या चित्रपटात टाईमिंग साधत आपल्या विनोदांनी सर्वांना खळखळून हसवण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. जिथे तुम्हाला या खुनाच्या रहस्याचं गुंतागुंतीचे गूढ उकलण्यात खूप मजा येईल.
जर तुम्हाला सस्पेन्स थ्रिलर मर्डर मिस्ट्री फिल्म्सची आवड असेल आणि तुम्हाला असे चित्रपट पाहायला आवडत असतील, तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो. हा एक असा चित्रपट आहे, जो तुम्हाला शेवटपर्यंत गुंतवून ठेवतो. तुम्हालाही हा चित्रपट पाहायचा असेल तर तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता. हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे, ज्याला IMDb वर खूप चांगलं रेटिंग देखील मिळालं आहे, जे 10 पैकी 6.9 आहे. एवढंच नाही तर, आजचे सर्व सस्पेन्स थ्रिलर मर्डर मिस्ट्री चित्रपटांसमोर हा चित्रपट अजूनही पुरून उरतो.