अहमदाबाद : सध्या आयपीएल हंगामात व्यस्त असलेला बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानला (Shahrukh Khan) रुग्णालयात दाखल करण्या आलं आहे. कडाक्याच्या उन्हामुळे त्याला त्रास होत असल्याने प्रकृती अस्वास्थतेमुळे शाहरुखला अहमदाबादमधील केडी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध हैदराबाद सनरायजर्सं यांच्यात मंगळवारी आयपीएलच्या (IPL) हंगामातील क्वालिफायर सामना झाला. या सामन्यात शाहरुख खानची मालकी असलेल्या केकेआरने बाजी मारली. त्यानंतर, शाहरुखने स्वत: मैदानात फिरुन चाहत्याचे अभिवादन केले होते. तसेच, केकेआरच्या विजयाचा .जल्लोषही साजरा केला होता. मात्र, आज उष्माघातामुळे शाहरुखला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
शाहरुख सध्या केकेआर टीमसह अहमदाबादमध्ये आहे. आयपीएल हंगामातील यंदाचे सामने तो सहकुटुंब एन्जॉय करताना दिसून येतो. अहमदाबादमध्येही उन्हाळ्याचा कडाका जाणवत असून तिथे 40 अंश सेल्सियस एवढे तापमाने आहे. शाहरुखला आज दुपारी अस्वस्थ वाटू लागल्याने अहमदाबादच्या केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या, शाहरुखला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं असून शाहरुखची प्रकृती उत्तम आहे. केवळ, उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्याने अभिनेत्यास रुग्णालयात भरती करण्यात आले.
विजयानंतर शाहरुखच्या टीमचा जल्लोष
आयपीएल 2024 मधील क्वालिफायर 1 सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून फायनलमध्ये धडक मारली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच्या या सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांनी खरोखरच कमाल केली. त्यांनी हैदराबादचा अख्खा डाव 159 धावांत गुंडाळला. त्यामुळं कोलकात्यासमोर विजयासाठी केवळ 160 धावांचं आव्हान होतं. कोलकात्यानं तब्बल 38 चेंडू आणि आठ विकेट्स राखून विजयी लक्ष्य गाठलं. वेंकटेश अय्यर आणि कर्णधार श्रेयस अय्यरची नाबाद अर्धशतकं कोलकात्याच्या विजयात निर्णायक ठरली. त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 97 धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्याआधी, मिचेल स्टार्कनं तीन, तर वरुण चक्रवर्तीनं दोन विकेट्स काढून हैदराबादचा डाव गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली होती. फायनलमध्ये धडक मारल्यानंतर कोलकात्याच्या खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला. मंगळवारी रात्री कोलकात्याची खेळाडूंनी पार्टी केली. डिस्कोमध्ये खेळाडूंनी जोरदार डान्स केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
हेही वाचा
कोलकात्याची फायनलमध्ये धडक, हैदराबादचा आठ विकेटने पराभव, श्रेयस अय्यर-वेंकटेश अय्यरची अर्धशतके
Shahrukh Khan : 35 वर्षानंतर पुन्हा रिलीज होणार किंग खानचा चित्रपट, मनोज वाजपेयीचीही भूमिका, ज्याचे प्रेक्षकांनी नावही ऐकले नसेल...