Pune Porsche Car Accident : पुण्यात दोन जणांचा बळी घेणाऱ्या कार अपघातात सहभागी असलेल्या 17 वर्षीय मुलाचे वडील विशाल अग्रवालला (Vishal Agarwal) तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला आज (22 मे) कडेकोट बंदोबस्तात पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. विशाल अग्रवालसह बार मालक, व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांची सुद्धा कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 






ब्लॅक पबचे कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश बोनकर यांनी कोणाच्या मेंबरशिपने अल्पवयीन तरुणाला तिथे प्रवेश दिला? विशाल अग्रवाल यांनी विना नंबर प्लेट गाडी का चालवण्यास दिली? वडिलांनी मुलाला पबमध्ये जाण्याची का संमती दिली? मुलाला खर्च करण्यासाठी पॉकिट मनी कुठल्या स्वरूपात दिला? गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल फरार का झाले? ते जेव्हा संभाजी नगरमध्ये आढळून आले तेव्हा त्यांच्याकडे एक साधा मोबाईल मिळून आला बाकीचे त्यांचे मोबाईल कुठे आहेत? वरील सगळ्या गोष्टीसाठी तपास करण्यासाठी सरकारी वकिलांनी सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. 






न्यायालयात हजर करण्यासाठी नेताना शाईफेक 


दरम्यान, कोर्ट परिसरात पोहोचताच विशाल अग्रवालवर (Vishal Agrawal) शाई फेकीचा प्रयत्न करण्यात आला. विशालला घेऊन आलेल्या पोलीस व्हॅनवर शाई फेकण्यात (Ink Attack) आली. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तो बचावला. वंदे मातरम संघटनेनं शाईफेक केली. वंदे मातरम संघटनेच्या पाच ते आठ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विशालवर  आधीपासून गुन्हे दाखल असल्याने त्याच्यावर मोकातंर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली.



विशाल अग्रवाल ब्रह्मा कॉर्पचा मालक


दरम्यान, विशाल अग्रवाल आजोबा ब्रह्मदत्त अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या ब्रह्मा कॉर्पचे मालक आहेत. त्याची कन्स्ट्रक्शन कंपनी पुण्यात अनेक पंचतारांकित हॉटेल्स बांधण्यात गुंतलेली असताना, ब्रह्मा मल्टीस्पेस आणि ब्रह्मा मल्टीकॉन सारखे व्यवसायही अग्रवाल कुटुंबाच्या मालकीचे आहेत. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या 17 वर्षीय विशालच्या मुलाने रविवारी पहाटे पुणे शहरातील कल्याणीनगर येथे दोघांचा जीव घेतला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या