NehuPreet म्हणून ओळखली जाणारी नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह ही सेलिब्रिटी जोडी त्यांच्या विवाहसोहळ्यापासून ते अगदी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळं सतत चर्चेत येत असते. त्यांचं एखादं नवं गाण असो किंवा मग लव्हस्टोरी. नेहा आणि रोहनप्रीत मागील काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या सेलिब्रिटी जोड्यांपैकी एक आहेत. आता म्हणजे या जोडीच्या सहजीवनाच्या नात्यात एका नव्या पाहुण्याची चाहूल लागली आहे.


नेहा गरोदर असण्याच्या चर्चांनी अधिक जोर धरला आहे. याला कारण ठरत आहे ती म्हणजे तिनं केलेली एक सोशल मीडिया पोस्ट. टोन्ड जमसूट आणि पांढऱ्या स्निकर्समध्ये नेहा आणि तिच्यासोबत सूट, काळ्या रंगाची पगडी अशा रुबाबदार लूकमध्ये असणारा रोहनप्रीत यावेळी त्यांच्या फोटोच्या पोझमुळं अनेकांचं लक्ष वेधत आहेत.


   PHOTO | हाय हिल्स, बॉडीकॉन ड्रेस अन् बेबी बम्प; करीना कपूरचा क्लासी अंदाज


#khyaalRahyaKar म्हणजे काळजी घेत जा.... असं कॅप्शन नेहानं या फोटोला दिलं. नेहाच्या या फोटोवर कमेंट करत, तिचा पती रोहनप्रीत यानंही, ‘आता तर जास्तच काळजी घ्यावी लागेल नेहू’ अशी प्रतिक्रिया दिली. शिवाय रोहनप्रीतनंही हाच फोटो पोस्ट करत एकसारखंच कॅप्शन दिलं आहे. या दोघांनीही फोटो शेअर करताच कमेंट बॉक्समध्ये चाहत्यांनी लगेचच या जोडीला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.


नेहा आणि रोहनप्रीतनं तिच्या गरोदरपणाबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य केलं नसलं तरीही त्यांनी पोस्ट केलेला हा फोटो बराच बोलका आहे. त्यामुळं आता तो प्रचंड व्हायरल होत आहे.


   PHOTO : 'नेहू दा व्याह'... नेहा कक्कर आणि रोहनप्रीतच्या हळदी समारंभाचे खास फोटो





नेहा आणि रोहनप्रीत हे २६ ऑक्टोबरला विवाहबंधनात अडकले होते. दिल्लीमध्ये असणाऱ्या एका गुरुद्वारामध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. ज्यानंतर एका खास स्वागत सोहळ्याचं अर्थात रिसेप्शनचंही आयोजन करण्यात आलं होतं. एकिकडे नेहा कलाविश्वात यशशिखरावर असतानाच दुसरीकडे रोहनप्रीतही या क्षेत्रात नावारुपास आला आहे. हल्लीच या दोघांनी मिळून ‘नेहू दा व्याह’ हे गीत साकारलं होतं. प्रेक्षकांनी या गाण्याला बरीच पसंती दिली होती.