Bachchan family | अमिताभ, अभिषेक यांच्या व्यतिरिक्त बच्चन कुटुंबातील सदस्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह
एबीपी माझा वेब टीम | 12 Jul 2020 01:12 AM (IST)
अभिनेते अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांच्या व्यतिरीक्त बच्चन कुटुंबातील सदस्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, दोघा बापलेकांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
मुंबई : अमिताभ आणि अभिषेक यांच्या व्यतिरिक्त बच्चन कुटुंबातील बाकी सदस्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अमिताभ आणि अभिषेक यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक-ऐश्वर्या यांची आठ वर्षांची मुलगी आराध्या बच्चन हिची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. कोरोना चाचणीनंतर बापलेकांची ट्विटर वर माहिती "मी आणि माझे वडील आम्हा दोघांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलीय. आम्हाला दोघांना कोरोनाची सौम्य लक्षणं असून रुग्णालयात भरती करण्यात आलंय. मी सर्व स्टाफ आणि कुटुंबातील सदस्यांना कोरोना चाचणी करण्यास सांगितले आहे. मी सर्वांना विनंती करतो की शांत राहा आणि घाबरू नका. धन्यवाद", असं ट्विट अभिषेक याने केलंय. तर "माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मला रुग्णालयात भरती करण्यात आलंय. घरातील सदस्यांच्याही कोरोना चाचणी करण्यात आल्या असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. मागील 10 दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करावी" अशी विनंतीही बच्चन यांनी आपल्या ट्विटमध्ये केलीय. Abhishek Bachchan | अमिताभ बच्चन यांच्यानंतर मुलगा अभिषेक बच्चन याचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह अमिताभ आणि अभिषेक यांना सौम्य लक्षणं एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. अमिताभ यांना सुरुवातीला सौम्य लक्षणं दिसताच त्यांनी कोरोना टेस्ट करुन घेतली. त्यांच्या आणखी चाचण्या करण्यात येत असल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं आहे. अमिताभ आणि अभिषेक दोन्ही बापलेकांना मुंबईतील प्रसिद्ध नानावटी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. Amitabh Bachchan Infected with Corona महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण,ट्वीट करत दिली माहिती