Akshaya Tritiya 2024 : हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2024) हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावर्षी 10 मे अक्षय्य तृतीया हा सण साजरा केला जाणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि या दिवशी सोनं-चांदी खरेदीलाही विशेष महत्त्व आहे.अक्षय्य तृतीयेच्या दिवशी धातू खरेदीला विशेष महत्त्व आहे. धातू खरेदीसोबत घरात लक्ष्मीही येते, पैसा येतो, जो नेहमी टिकून राहतो, त्याचा कधीही क्षय होत नाही. 


अक्षय्य तृतीयेला तुमच्या राशीनुसार धातूंची खरेदी करणं शुभ ठरतं. तुम्हीही शुभ परिणामांसाठी आणि घरात पैशांची बरकत राहावी, यासाठी यंदाच्या अक्षय्य तृतीयेला खरेदी करू शकता.


अक्षय्य तृतीयेला राशीनुसार करा धातूची खरेदी (Buy these things on Akshaya Tritiya 2024)


मेष : या राशीच्या व्यक्तींनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने किंवा तांब्याच्या वस्तू खरेदी कराव्या. मेष राशीचा शासक ग्रह मंगळ आहे, त्यामुळे सोने किंवा तांबे त्यांच्यासाठी शुभ आहे.


वृषभ : या राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चांदी किंवा सोन्याची नाणी खरेदी करावी.


मिथुन : या राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कांस्य धातूच्या वस्तू खरेदी कराव्या.


कर्क : कर्क राशीच्या लोकांवर चंद्र देवाचा प्रभाव असतो, त्यामुळे या राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चांदीचा धातू खरेदी करणं चांगलं राहील.


सिंह : ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो. हाच सूर्य सिंह राशीचा शासक ग्रह आहे, त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींनी तांब्याची धातू खरेदी करावी.


कन्या : या राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कांस्य धातू खरेदी करणं फायदेशीर ठरेल.


तूळ : या राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चांदीच्या वस्तू खरेदी कराव्या.


वृश्चिक : या राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तांब्याच्या वस्तू खरेदी कराव्या.


धनु : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या राशीच्या लोकांनी सोन्यासोबत पितळ धातूची खरेदी करावी.


मकर : या राशीच्या लोकांसाठी स्टील आणि लोखंडी वस्तू खरेदी करणं शुभ ठरेल. याशिवाय तुम्ही तुमच्या गरजेनुसार सोन्याचे दागिने देखील खरेदी करू शकता.


कुंभ : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या राशीच्या लोकांनी लोखंडी धातूच्या वस्तू खरेदी कराव्या. याशिवाय तुम्ही सोनं आणि चांदी देखील खरेदी करू शकता.


मीन : मीन राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पितळ धातू खरेदी करणं शुभ मानलं जातं.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Akshaya Tritiya 2024 : तब्बल 100 वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेला बनतोय गजकेसरी योग; 'या' 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, होणार अचानक धनलाभ