एक्स्प्लोर

Sonali Bendre on Cancer: 'जेव्हा केस गळायला लागले...', सोनाली बेंद्रेनं सांगितला कॅन्सरनंतरचा अनुभव, आयुष्यात कोणते बदल झाले?

Sonali Bendre open up about Cancer: सोनाली बेंद्रेच कधी बदलला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन?

Sonali Bendre on Cancer Journey: 2018साली बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या (Sonali Bendre) आयुष्यात कलाटणी देणारा प्रसंग घडला, ज्यामुळे तिचं आयुष्य पूर्णपणे 360 डिग्रीनं फिरलं. सोनालीला कॅन्सरचं (Cancer) निदान झालं. तिने सोशल मीडियातून हाय ग्रेड मेटास्टॅटिक कॅन्सर (चौथा टप्पा) झाल्याची माहिती दिली. न्यू यॉर्कमध्ये तिने कीमोथेरपी (Chemotherapy) घेतली. अलिकडेच अभिनेत्रीने सौमित्र पोटेंच्या 'मित्र म्हणे'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत अभिनेत्रीने विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी तिने कॅन्सरवर चर्चा केली. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर स्वत:ला कसं  सावरलं? लूक्समध्ये बदल, यावर तिने चर्चा केली.

कॅन्सर निदान झाल्यानंतर सोनाली बेंद्रेने सांगितला अनुभव (Sonali Bendre open up about Cancer journey)

सोनाली बेंद्रे म्हणाली की, 'प्रत्येकाच्या आयुष्यात लूक्स महत्त्वाचे असतात. आपली सोसायटीच तशी आहे. पहिल्या भेटीत आपण जज करतो, आणि माझ्याबाबतीत माझी ओळख माझ्या दिसण्यावर अवलंबून होती. मला असं वाटलं हा माझ्यासाठी धडा आहे. आई म्हणायची सौंदर्य माणसाच्या आत असतं. सौंदर्य आज आहे, उद्या कधीही जाऊ शकतं, आणि ही सत्य परिस्थिती आहे. जेव्हा केस गळायला लागले. औषधांमुळे जेव्हा शरीर सुजतं. त्यावेळी असं वाटलं की, हे शरीर आहे, कोणत्याही क्षणी बदलू शकतं. उद्या अपघात झाला किंवा काय... आपल्याला आई - वडील सांगतात, आपण पुस्तकात वाचतो'.

'जेव्हा होईल तेव्हा बघू आपण असा विचार करतो. पण आपल्या आयुष्यात अशा प्रकारचे प्रसंग घडतात, तेव्हा खऱ्या अर्थाने याची जाणीव होते. जाणीव  झाल्यानंतर ही बाब तुम्ही कसं स्वीकारता, हे तुमच्या हातात आहे.  स्वीकार करणं शक्य नाही, पण त्यावर उपाय काय? आपण आतल्या आत उगाच कुढत राहणार', असं सोनाली बेंद्रे म्हणाली.

'वास्तव स्वीकारणं खूप कठीण आहे. आपण स्वत:शी खूप खोटं बोलतो. त्रास नको असल्यामुळे आपण काही गोष्टी दुर्लक्षित करतो. पण तुम्हाला या गोष्टींना सामोरं जाणं गरजेंच आहे.  सामोरे गेलात तरच, त्याच्या पुढे जाल. पुढे गेलात तर, नवीन जग तुमच्या स्वागतासाठी उभं असतं', असं अभिनेत्री म्हणाली. 'अशा काळात तुम्हाला मदत लागू शकते. मी थेरेपी घेतली. अशावेळी सपोर्ट सिस्टम गरजेचं असतं. काहींकडे सपोर्ट सिस्टम नसतो. सपोर्ट सिस्टम लवकर नाही बनत, नाती तयार व्हायला वेळ लागतो', असं अभिनेत्री म्हणाली.  

'तेव्हा केस खूप गळाले होते. काही चॉईस नव्हता. मी केसांचे विग्स बनवले होते. पण त्या विग्समुळे खूप त्रास झाला, खूप घाम यायचा. तेव्हा मला खरंच जाणवलं की, सौंदर्य काही सेकंदात जाऊ शकतं. मग त्याच्यापुढे काय? असं नाही की सौंदर्य गेलं म्हणजे आयुष्य संपलं. तुम्हाला हे स्वीकारणं गरजेचं आहे. मला तेव्हा कळालं की, आपल्या हक्काची लोकं किती आहेत, आणि आपल्यावर किती प्रेम करतात. प्रत्येक दिवस तुमच्यासाठी बोनस आहे, ही गोष्ट तेव्हा जाणवली'.

कॅन्सर निदान झाल्यानंतर सोनाली बेंद्रेच्या आयुष्यात कोणते बदल झाले?

'सर्वात मोठे बदल, सर्वात छोट्या गोष्टींपासून होतात.  मुख्य म्हणजे, रोजच्या दिवसाकडे बघण्याचा दृष्टीकोन जेव्हा बदलतो, तेव्हा आयुष्यच बदलतं', असं अभिनेत्री म्हणाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Kiara And Siddharth Second Child: 'कुणीतरी येणार गं...' कियारा अडवाणी अन् सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा होणार आई-बाबा; प्रेग्नेंसीची घोषणा, पोस्टने वेधलं लक्ष

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
Milind Gawali on Madhu Kambikar: 'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
Advertisement

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार
Global Diesel Crisis : डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
Gold Rate Today: सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
Embed widget