Bollywood Actress: रजनीकांत (Rajinikanth), मामूटी (Mammootty), थलापती विजय (Vijay), अजित कुमार, चिरंजीवी, कृष्णा घट्टामनेनी, दग्गुबती वेंकटेश, नंदमुरी बालकृष्ण, विजयकांत, प्रभू, कार्तिक आणि जगपती बाबू यांच्यासोबत एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे देणारी साऊथची सुपरस्टार अभिनेत्री (South Superstar Actress) आज तब्बल 2000 कोटींची मालकीण आहे. साऊथमधल्या कोणतीही भाषा अवगत नसतानाही तिनं मल्याळम इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला आणि दमदार भूमिकांसोबतच आपल्या सौंदर्यानं चाहत्यांना घायाळ केलं. बरं या अभिनेत्रीची ओळख सांगण्यासाठी फक्त एकच नाव नाही, अनेक नाव आहेत.
आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत सांगतोय, तिचं नाव येदी विजयालक्ष्मी. तिचा जन्म आंध्र प्रदेशातील विजयवाडा इथला. वयाच्या पंधराव्या वर्षी तिनं पहिल्यांदाच शालेय नाटकात देवी अम्मनची भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला. पण, यामुळे तिचं आयुष्य बदललं.यानंतर तिनं 1992 मध्ये मल्याळम दिग्दर्शक हरिहरन यांच्या 'सरगम' या चित्रपटातून पदार्पण केलं, ज्यानं अनेक राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार जिंकले.
भाषा येत नव्हती, तरीसुद्धा सौंदर्यानं लाखोंना भूरळ घातली
जन्मानंतर तिला तिच्या घरच्यांनी येदी विजयलक्ष्मी हे नाव दिलं. पण, तिनं जसजसे सुपरहिट सिनेमे दिले, तसतसं तिचं नाव बदलत गेलं. तिनं तिच्या पहिल्या चित्रपटात अमृता या नावानं इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. तिला याच नावानं पडद्यावर दाखवलं गेलं. लोक तिचा खूप आदर करायचे, कारण त्यांना कळालेलं की, ती मल्याळी नाही. तिला मल्याळी भाषेचा एकही शब्द येत नव्हता. तरीसुद्धा तिनं खूप चांगलं काम केलं.
अमृता नंतर, तिनं रंभा नावानं प्रसिद्धी मिळाली
अमृता म्हणून प्रसिद्ध झालेल्या या अभिनेत्रीला नंतर एक तेलुगू चित्रपट मिळाला. आणि तिला मिळालेले नाव अजूनही प्रचलित आहे. ही अभिनेत्री म्हणजे, अगदी मामुटी, रजनिकांत आणि सलमान खानपर्यंत सर्वांसोबत रोमान्स केलेली 'रंभा'. कालांतरानं याच नावानं तिला अख्खी इंडस्ट्री ओळखू लागली. तिच्या पदार्पणानंतर, रंभाला ए-लिस्टर्स आणि इंडस्ट्रीतील दिग्गजांचे लक्ष वेधून घेण्यास जास्त वेळ लागला नाही. तिनं अनेक सुपरस्टार्ससोबत स्क्रिन शेअर केली.
रंभानं 'अरुणाचलम', 'हिटलर', 'क्रॉनिक बैचलर', 'निनैथेन वंधई', 'कथला कथला', 'माथो पेट्टुकोकु', 'धर्म चक्रम', 'रासी', 'एंड्रेंड्रम कधल', 'चंपाकुलम थाचन', 'सिद्धार्थ', 'मुद्दुला प्रियुडु', 'अल्लारी प्रेमिकुडु' आणि 'राउडी अन्नय्या' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. त्यांनी मल्याळम, तमिळ आणि तेलुगु सिनेमां व्यतिरिक्त हिंदी, कन्नड़, बंगाली आणि भोजपुरी सिनेमांमध्येही काम केलं. त्यांनी सलमान खानसोबत 'बंधन' सिनेमा केलेला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :