Narendra Bhondekar on Sanjay Savkare : राज्य सरकारने भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत (Bhandara Guardian Minister) बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे (Sanjay Savkare) हे भंडाऱ्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहत होते. मात्र आता ही जबाबदारी गृहराज्यमंत्री पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, संजय सावकारे यांना बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सावकारे यांना अचानक पालकमंत्रिपदावरून कमी का करण्यात आले? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आता आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या प्रकरणावरून खळबळजनक आरोप केलाय.  

Continues below advertisement

आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले की, भंडाऱ्याचे पालकमंत्री पद सोडण्यासाठी मंत्री संजय सावकारेंवर दबाव होता. मागील दहा-पंधरा दिवसांपासून हे मी ऐकत होतो की, स्वतः पालकमंत्री संजय सावकारे हे भंडारा सोडण्यास इच्छुक होते. कारण त्यांना थोडाफार त्रास होत होता. काय त्रास होता या बाबतीत मी खोलात जाणार नाही. परंतु ते पद सोडण्यास इच्छुक होते, असा आरोप त्यांनी यावेळी केला.  त्यांनी दोन-तीन वेळेस पद सोडण्यासाठी आग्रह केला होता. मला भंडारा नको, मला इकडे त्रास होत आहे किंवा मला माझ्या जवळच्या जिल्हा द्या, असे ते म्हणत होते. त्यांनी आग्रह केल्यामुळे कदाचित बदल झाला असेल, असे देखील त्यांनी यावेळी म्हटले. 

बाहेरचे लोक किती वेळ देऊ शकणार? 

नरेंद्र भोंडेकर पुढे म्हणाले की, मागच्या निधीत आम्हाला पाहिजे तसा निधी मिळत होता. मात्र, यंदा दबाव असल्याने तसा निधी मिळाला नाही. बाहेरच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री आला तर तो वेळ देऊ शकत नाही. आमची मागणी हीच आहे की पालकमंत्री हा स्थानिकच असावा. बाहेरचे लोक येऊन आम्हाला किती वेळ देऊ शकणार आहेत? स्थानिक आमदारांना कामच देऊ नका, असं जर पालकमंत्र्यांना सांगितलं जात असेल तर ते चुकीचं आहे, असे त्यांनी म्हटले आहे.  

Continues below advertisement

सावकारेंच्या डिमोशनची नेमकी कारणं काय? 

- सावकारे पालकमंत्री म्हणून ते पूर्णकाळ उपलब्ध नसायचे. 

- झेंडा टू झेंडा (15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी) ते भंडाऱ्यात येतं असे. 

- भंडाऱ्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीनंतरही ते भंडाऱ्यात आले नव्हते.  

- यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला होता. 

- भंडारा जिल्ह्याची जाण असणाऱ्या जवळच्या जिल्ह्यातील मंत्र्यांना पालकमंत्री करावा, अशी नागरिकांची ओरड होती.  - पालकमंत्री सावकारे हे जिल्हा विकासाबाबत ठोस निर्णय घेण्यात सक्षम ठरले नाही. 

- पालकमंत्री सावकारे हे जळगाव इथून येत होते. भंडाऱ्याला वेळ देण्यात ते कमी पडले आणि यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची जिल्ह्यात हळूहळू ताकद वाढायला लागली होती. 

- आगामी नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने पंकज भोयर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

पंकज भोयर यांची प्रतिक्रिया 

पंकज भोयर यांची भंडाऱ्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, वरिष्ठ नेतृत्वाचे मी आभार व्यक्त करेल. मागील सहा ते सात महिन्यांपासून जे काम सुरू आहे त्याची दखल त्यांनी घेऊन माझी जबाबदारी वाढवलेली आहे. वरिष्ठ नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या जबाबदारीची पूर्ण जाण ठेवून मी चांगल्या पद्धतीने भंडारा जिल्ह्यात येणाऱ्या काळात काम करून दाखवेल. संजय सावकारे यांचे देखील काम अतिशय चांगले आहे. कदाचित भौगोलिक दृष्ट्या त्यांना भंडारा जिल्हा दूर पडत असावा, त्यामुळे असा निर्णय घेतला असावा, असे त्यांनी म्हटले आहे.  

आणखी वाचा 

Laxman Hake: पापड्या आमदार, तुला जरांगेची काय चाटायचीय ती चाट; लक्ष्मण हाकेंचा विजयसिंह पंडितांवर हल्लाबोल