Bollywood Villain : एक हिरो, एक हिरोईन आणि एक व्हिलन... म्हणजे परफेक्ट बॉलिवूड फिल्म. कित्येक दशकं बॉलिवूडचं (Bollywood) गणित याच सुत्रावर सुरू आहे. जेवढा सिनेमात हिरो महत्त्वाचा, तेवढीच हिरोईनही महत्त्वाची आणि तेवढाच व्हिलनही. सिनेमाचा खलनायक जेवढा क्रूर, कपटी तेवढाच हिरो मोठा होतो. आजवर हिंदी सिनेसृष्टीत (Hindi Film Industry) अनेक स्टार्सनी खलनायकाची भूमिका साकारली आणि ती तेवढीच मोठीही केली. यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांच्या नावांचा समावेश होतो. अमजद खान (Amjad Khan), अमरीश पुरी (Amrish Puri), प्राण (Pran), डॅनी, गुलशन ग्रोव्हर (Gulshan Grover) आणि आशुतोष राणा (Ashutosh Rana) यांसोबतच अनेक स्टार्सचा समावेश आहे. 

70 च्या दशकात 'शोले' सिनेमात अमजद खान यांनी खलनायक म्हणून छाप सोडली. आजही बॉलिवूडचा महान खलनायक कोण? असं कुणीही विचारलं तरीसुद्धा अमजद खान यांचंच नाव सर्वांच्या ओठी येतं. पण 'शोले'नंतर असा अभिनेता आला, ज्यानं आपल्या खलनायकी भूमिकेनं केवळ 2 नाही तर 14 नायकांना हरवलं. त्याचा पडद्यावरचा अभिनयही सर्वांना अगदी खराखुरा वाटायचा. 

मल्टीस्टारर सिनेमात एकटा 14 स्टार्सवर भारी 

आम्ही ज्या खलनायकाबाबत सांगत आहोत, त्यानं 15 स्टार्स असलेल्या मल्टीस्टारर सिनेमात 14 स्टार्सना मागे टाकलं. या सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केलं होतं. पण, या मल्टीस्टारर सिनेमातल्या 14 जणांना सोडलं तर तो एकटा असाल होता, जो पडद्यावर अगदी उठून दिसला. या सिनेमातल्या डाकूला पाहिल्यावर लोकांना गब्बरची आठवण झाली. हा सिनेमा 27 नोव्हेंबर 1998 रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमाचं नाव होतं, 'चायना गेट'. ज्यामध्ये अमरीश पुरी, नसीरुद्दीन शाह, डॅनी डेन्झोंगपा, मुकेश तिवारी, ओम पुरी, समीर सोनी, कुलभूषण खरबंदा, टिनू आनंद, परेश रावल, विजय खोटे, जगदीप, अनुपम खेर, अंजन श्रीवास्तव, ममता कुलकर्णी आणि उर्मिला मातोंडकर यांसारखी तगडी स्टारकास्ट होती. 

सर्वोत्तम खलनायक साकारण्यासाठी 50 दिवसांपर्यंत आंघोळच केली नाही 

या चित्रपटातील 'छम्मा छम्मा' हे गाणे आजही लोकप्रिय आहे, परंतु या चित्रपटात खलनायक कसा आला? याची पडद्यामागची गोष्ट खूप गंमतीशीर आहे. चित्रपटातील खलनायक जगीराची भूमिका अभिनेता मुकेश तिवारीनं (Mukesh Tiwari) साकारली होती. जेव्हा मुकेशला या भूमिकेसाठी फोन आला, तेव्हा त्याच्याकडे मुंबईला जाण्यासाठी पैसे नव्हते, तेव्हा त्याच्या एका मित्रानं मुकेशला मदत केली आणि तो मुंबईला पोहोचला. या भूमिकेसाठी मुकेशनं 50 दिवस आंघोळ केली नाही. भूमिकेनुसार, त्याला घाणेरडं दिसावं लागलं, पण वास टाळण्यासाठी परफ्यूम वापरण्यात आला. वासामुळे गरुड आणि कावळे देखील त्याच्याभोवती घिरट्या घालू लागले. शुटिंग दरम्यान त्याला पाहून घोडाही नियंत्रणाबाहेर गेला. या सिनेमातला डायलॉग आजही चर्चेत आहे. तो म्हणजे, "मेरे मन को भयाया मैं कुट्टा कट के खाया...". हा सिनेमा 9.25 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता आणि त्यानं 22.30 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bollywood Actor Struggle Life: 350 फिल्म्सचा हिरो, ज्याच्यासोबत नॅशनल अवॉर्ड विनर अभिनेत्रीला करायचं नव्हतं काम, पुढे 'या' दिग्गज अभिनेत्रीनं दिली साथ, आजही इंडस्ट्रीत मिरवतोय 'हा' सुपरस्टार