Kangana Ranaut Takes A Dig On Bollywood : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) तब्बल दीड वर्षानंतर ट्विटरवर पुन्हा आली आहे. ट्विटरवर पुनरागमन करत कंगनाने पुन्हा एकदा फिल्म इंडस्ट्रीवर निशाणा साधला आहे. कंगनाने कोणाचेही नाव घेतले नसले तरी तिचे ट्विट पाहता शाहरुख खानच्या नुकत्याच रिलीज झालेल्या पठाण चित्रपटावर निशाणा साधल्याचं दिसतंय. आज शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
फिल्म इंडस्ट्रीवर साधला निशाणा
कंगना रनौतने ट्विट केले की, फिल्म इंडस्ट्री "मूर्ख" आहे. जिथे आर्ट प्रोजेक्टचं यश पैशांनी मोजलं जातं. कंगनाची ही विशेष टिप्पणी शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित पठाण चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशी आली आहे. या चित्रपटाची रेकॉर्डब्रेक ओपनिंग होण्याची अपेक्षा आहे. कंगना म्हणाली की कोणताही प्रयत्न/निर्मिती/कलेच्या यशानंतर ते तुमच्या चेहऱ्यावर कमाईचे आकडे फेकतात. जणू काही कलेचा दुसरा कोणता हेतू नसतो. यातून त्यांची संकुचित मानसिकता दिसून येते.
सिनेमा पैशांसाठी नाहीच
कंगनाने पुढे असंही म्हटलं आहे की इतर उद्योगांप्रमाणे "मोठ्या आर्थिक नफ्यासाठी" सिनेमा बनवला जात नाही आणि म्हणूनच कलाकारांची पूजा केली जाते. कंगनाने पुढे लिहिलं आहे की, “सुरुवातीला कला मंदिरांमध्ये बहरली आणि साहित्य/नाटक आणि शेवटी थिएटरमध्ये पसरत गेली. ही एक इंडस्ट्री आहे म्हणूनच कला/कलाकारांची पूजा केली जाते आणि उद्योगपती किंवा अब्जाधीशांची नाही.
बॉक्स ऑफिसवर हिट होण्याच्या प्रतीक्षेत कंगना
कंगनाला तिच्या 2019 च्या 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटानंतर मोठे व्यावसायिक यश मिळालेले नाही. या चित्रपटाने देशांत बॉक्स ऑफिसवर 92 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर कंगना 'पंगा', 'थलाईवी' आणि 'धाकड' मध्ये दिसली पण यापैकी तिचा एकही सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला नाही. गेल्या वर्षीपासून कंगना तिच्या पहिल्या एकल दिग्दर्शनाच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटावर काम करत आहे. चित्रपट बनवण्यासाठी कंगनाने आपली संपत्ती गहाण ठेवल्याचा नुकताच खुलासा केला. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Kangana Back on Twitter: ती पुन्हा आली! कंगना रनौत ट्विटरवर परतली, पहिलं ट्वीट करत म्हणाली.....