Nirmala Sitharaman in Mumbai : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आजपासून मुंबईच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात निर्मला सीतारमण महाराष्ट्रातील विविध घटकांसोबत अर्थसंकल्पाबाबत चर्चा करणार आहेत. अर्थमंत्र्यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यातील उद्योजक, व्यावसायिकांसोबत त्या चर्चा करणार आहेत. 


अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार, मोठ्या प्रमाणावर कर भरणारे करदाते आणि काही मोजक्या मान्यवर व्यक्तींच्या भेट घेणार असून अर्थसंकल्प 2022-23 वर चर्चा करणार आहेत. मुंबईत सकाळी 10.30 वाजल्यापासून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. 







अर्थमंत्र्यांनी दिल्लीतील अनेक उद्योग क्षेत्रातील घटकांसोबत चर्चा केली आहे.  सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या योजना सुरू ठेवण्यासाठी आगामी आर्थिक वर्षासाठी या अर्थसंकल्पाने भांडवली खर्च 35.4 टक्क्यांनी वाढवून 7.5 लाख कोटी रुपये केला आहे.


या गुंतवणुकीद्वारे खाजगी सहभाग वाढवण्याबरोबरच नवीन रोजगारदेखील निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दिल्लीतील उद्योजक, व्यावसायिकांसोबत चर्चा केल्या आहेत. अर्थसंकल्पाशी संबंधित अनेक संबंधित काही मुद्दे त्यांनी स्पष्ट केल्या होत्या. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha