एक्स्प्लोर

मुलगी झाली हो... सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचं प्रमोशन, चिमुकल्या पावलांनी घरात लक्ष्मीचं आगमन

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth malhotra )  आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (kiara advani) यांच्या घरी एका लहान परीचे आगमन झाले आहे. कियाराने एका मुलीला जन्म दिला आहे.

Sidharth malhotra and kiara advani  : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth malhotra )  आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (kiara advani) यांच्या घरी एका लहान परीचे आगमन झाले आहे. कियाराने एका मुलीला जन्म दिला आहे. लग्नानंतर अडीच वर्षांनी दोघेही पालक झाले आहेत. दोघांनी 2023 मध्ये लग्न केले होते. सिद्धार्थ आणि कियाराची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये दोघांनीही त्यांच्या सर्व चाहत्यांना दोघेही पालक होण्यासंदर्भातील माहिती दिली होती. 

28 फेब्रुवारी रोजी आपण गरोदर असल्याचे सांगत कियाराने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये दोघांनीही हातात बाळाचे मोजे धरले होते. फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट. लवकरच येत आहे. आता तो दिवस आला आहे. कियाराने एका मुलीला जन्म दिला आहे. 

सिद्धार्थ आणि कियाराचे अडीच वर्षांपूर्वी झाले होते लग्न 

सिद्धार्थ आणि कियाराचे लग्न सुमारे अडीच वर्षांपूर्वी झाले होते. दोघांचे लग्न 7 फेब्रुवारी 2023 रोजी झाले. 2021 मध्ये 'शेरशाह' नावाचा चित्रपट एकत्र प्रदर्शित झाला. असे म्हटले जाते की दोघांची प्रेमकहाणी या चित्रपटाच्या सेटवरून सुरू झाली होती. या चित्रपटात प्रेषकांना देखील दोघांची जोडी खूप आवडली होती. त्यानंतर 2023 मध्ये दोघांनी लग्न केले. आता दोघेही एका मुलीचे पालक झाले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर लोक दोघांचेही अभिनंदन करत आहेत.

गरोदरपणासाठी कियाराने सोडला मोठा चित्रपट 

कियारा अडवाणी लवकरच हृतिक रोशनसोबत 'वॉर 2' मध्ये दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे आणखी एक मोठा चित्रपट होता. तो म्हणजे फरहान अख्तरचा 'डॉन 3'. त्यात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे आणि कियारा त्याच्यासोबत होती. पण गरोदरपणामुळे कियाराने हा चित्रपट सोडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'डॉन 3' मध्ये कियाराची जागा कृती सेननने घेतली आहे.

एका मुलाखतीत कियारा अडवाणीला तुला ट्विन्स झाली तर दोघेही मुलं असावीत की मुली? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना 'मला फक्त दोन स्वस्थ मुलं हवी आहेत,' असं उत्तर दिलं होतं. या उत्तरानंतर करिना कपूरने कियाराशी मस्करी केली होती. त्यानंतर मला एक मुलगा हवा आहे आणि एक मुलगी हवी आहे, अशी इच्छा तिने व्यक्त केली होती.  

महत्वाच्या बातम्या:

Kiara Advani Sidharth Malhotra Announce Pregnancy: किआरा-सिद्धार्थकडे गूड न्यूज! क्युट फोटोसोबत चाहत्यांना दिली गोड बातमी!

महत्त्वाच्या बातम्या

Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: 'तुम्ही काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
'काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Pune Nashik Highway Accident: भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
Embed widget