एक्स्प्लोर

Bollywood Actor On Swami Samarth Paduka Pujan: बॉलिवूड अभिनेत्याच्या घरी श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं पूजन; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला...

Bollywood Actor On Swami Samarth Paduka Pujan: एका बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटीनं श्री स्वामी समर्थांच्या पादुका घरात आणून त्यांची मनोभावे पूजा केली आहे. यासंदर्भात अभिनेत्यानं सोशल मीडियावर एक पोस्टही केली आहे. 

Bollywood Actor On Swami Samarth Paduka Pujan: श्री स्वामी समर्थांचे (Shri Swami Samarth) अनेक भक्त आहेत. सिनेसृष्टीतही श्री स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. अनेक सेलिब्रिटींनी कित्येकदा बोलताना किंवा मुलाखतींमध्ये श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे किंवा समर्थांच्या दृष्टांतांचे अनेक किस्से ऐकवले आहेत. अनेक सेलिब्रिटी मोठ्या भक्तीभावानं श्री स्वामी समर्थांची मनोभावे पूजा करतात. तसेच, अनेकजण तर सेटवर मोकळ्या वेळात किंवा अडीनडीच्या वेळी श्री समर्थांचा धावा करतात असंही अनेकांनी सांगितलं आहे. अशातच आता एका बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटीनं श्री स्वामी समर्थांच्या पादुका घरात आणून त्यांची मनोभावे पूजा केली आहे. यासंदर्भात अभिनेत्यानं सोशल मीडियावर एक पोस्टही केली आहे. 

'जब वी मेट', 'अजब प्रेम की गजब कहानी' यांसारख्या सुपरहिट बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकलेला अभिनेता शाम मशाळकरच्या (Sham Mashalkar) घरी श्री समर्थांच्या पादुकांचं आगमन झालेलं. अभिनेत्यानं मनोभावे स्वामींच्या पादुका घरी आणल्या आणि त्यांची सप्त्नीक मनोभावे पूजा अर्चा करुन आदरातिथ्य केलं. यासंदर्भात अभिनेत्यानं सोशल मिडिया हँडलवर पोस्टही केली आहे.  तसेच, एक व्हिडीओही शेअर केला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sham Mashalkar (@shammashalkar)

अभिनेत्यानं इन्स्टापोस्टमध्ये काय म्हटलंय? 

"आमच्या घरी काल तिन्हीसांजेच्या वेळी *श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका गुरुमंदिर (श्री बाळप्पा मठ) अक्कलकोट* यांचे पुजन झाल्यानं प्रसन्न वाटलं. स्वामींची कृपा", असं कॅप्शन त्यानं या पोस्टला दिलं आहे. या पूजेत त्यांच्या कुटुंबीयांनी भाग घेतला होता. शामच्या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.                            

श्री समर्थांच्या पादुका काही भक्तमंडळींच्या घरी पूजाअर्चेसाठी नेल्या जात असतात. स्वामींच्या पादुका घरी आणल्यानंतर भक्तांकडून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. तसेच, त्यांना दुग्धाभिषेक घालून नैवेद्य दाखवला जातो. अशाच स्वामींच्या पादुका प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी नेण्यात आल्या होत्या. त्यानंतर अभिनेत्यानं पादुकांची मनोभावे पूजा केली. 

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता शाम मशाळकरनं अनेक सुपरहिट मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'क्या लव्हस्टोरी है', 'पानीपत', 'हाऊसफुल 4', 'युवराज', 'अजब प्रेम की गजब कहानी' यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनेत्यानं महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Prajakta Mali Post: 'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
Toxic Trailer Out: कमजोर मनाचे असाल तर जरा लांबच राहा! 'टॉक्सिक'चा ट्रेलर पाहून डोकं सुन्न होईल; रक्ताचा 4 मिनिटं 38 सेकंदांचा थरार!
कमजोर मनाचे असाल तर जरा लांबच राहा! 'टॉक्सिक'चा ट्रेलर पाहून डोकं सुन्न होईल; रक्ताचा 4 मिनिटं 38 सेकंदांचा थरार!
Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
Embed widget