एक्स्प्लोर

रणवीर, रणबीर या सगळ्यांच्या आधी 'या' अभिनेत्यानं केलंय दीपिका पदुकोणला डेट; वक्तव्याची एकच चर्चा; दोनदा मिळालाय शौर्य पुरस्कार

करिअरच्या सुरुवातीला मॉडेलिंग आणि चित्रपटांमध्ये चांगलं यश मिळूनही मुजम्मिलने प्रसिद्धीच्या मागे धावण्याऐवजी निवडक प्रकल्पांमध्ये काम करण्याला प्राधान्य दिलं

Bollywood Actor Dated Deepika Padukon Statement: बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukon) कायमच कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे प्रसिद्धीझोतात येते. कधी तिच्या पूर्वीच्या नात्यांमुळे तर कधी तिने कामातून घेतलेल्या ब्रेकमुळे तर कधी आठ तासांच्या शिफ्टमुळे. रणवीर सिंह आणि दीपिका आता दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत. दरम्यान, दीपिका चर्चेत आली आहे एका अभिनेत्याच्या दाव्यामुळे. बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तो आणि दीपिका जवळपास दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा या अभिनेत्याने केला आहे. हा अभिनेता आणि मॉडेल म्हणजे मुजम्मिल इब्राहिम.

अलीकडील मुलाखतीत मुजम्मिलने दावा केला की, दीपिका पदुकोण मुंबईत आल्यानंतर दोघांची ओळख झाली आणि जवळपास दोन वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. त्याच्या म्हणण्यानुसार, म्युझिक व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर दीपिकानेच त्याच्याशी संवाद सुरू केला होता. दीपिकाचं रणवीर सिंहसोबत लग्न होईपर्यंत दोघांमध्ये मैत्री कायम होती, असाही दावा त्याने केला आहे.

दोनवेळा मिळालाय शौर्य पुरस्कार 

मुजम्मिल केवळ या वक्तव्यामुळेच नाही, तर अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी केलेल्या धाडसी कामगिरीमुळेही ओळखला जातो. अवघ्या आठव्या वर्षी त्याने मित्राचा जीव वाचवला होता. इतकंच नाही, तर आयुष्यात दोन वेळा शौर्य पुरस्कारही त्याच्या नावावर आहेत.25 ऑगस्ट 1986 रोजी श्रीनगरमध्ये जन्मलेल्या मुजम्मिल इब्राहिमचं बालपण जम्मू-काश्मीरमधील अस्थिर वातावरणात गेलं. 1994 मध्ये तो केवळ आठ वर्षांचा असताना त्याने आपल्या शाळेतील एका मित्राला बुडण्यापासून वाचवलं. या धाडसी कामगिरीबद्दल त्याला भारत सरकारकडून 'जीवन रक्षा पदक' या प्रतिष्ठेच्या शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.काही वर्षांनी गोव्यात सुट्टीदरम्यानही त्याने पुन्हा एकदा धाडस दाखवत अरबी समुद्रात बुडणाऱ्या एका ब्रिटिश महिलेचे प्राण वाचवले. या घटनेनंतर त्याला गॉडफ्रे फिलिप्स नॅशनल ब्रेव्हरी अवॉर्ड मिळाला.2003 मध्ये मुजम्मिलने 'ग्लॅडरॅग्स मॅनहंट' स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर तो देशातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या पुरुष मॉडेल्सपैकी एक बनला. अनेक जाहिराती, म्युझिक व्हिडिओ आणि फॅशन शोमुळे त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Muzammil Ibrahim (@muzamilibrahim7)

'धोखा'मधून केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण

मुजम्मिलने पूजा भट्टसोबत 'धोखा' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेता पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.त्यानंतर तो 'गुड बॉय, बॅड बॉय', 'विल यू मॅरी मी?' या चित्रपटांमध्ये झळकला. तसेच 'स्पेशल ऑप्स' या लोकप्रिय वेब सीरिजमध्येही त्याने महत्त्वाची भूमिका साकारली.करिअरच्या सुरुवातीला मॉडेलिंग आणि चित्रपटांमध्ये चांगलं यश मिळूनही मुजम्मिलने प्रसिद्धीच्या मागे धावण्याऐवजी निवडक प्रकल्पांमध्ये काम करण्याला प्राधान्य दिलं. त्यामुळे बॉलिवूडमध्ये तो सुपरस्टार झाला नसला, तरी धाडस, मॉडेलिंग आणि अभिनय या तिन्ही क्षेत्रांमधील त्याचा प्रवास आजही अनेकांच्या लक्षात आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, पण शेवटची इच्छा राहिली; गणेश थोरात ढसाढसा रडले!
नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, पण शेवटची इच्छा राहिली; गणेश थोरात ढसाढसा रडले!
Nana Patekar Tanushree Dutta: नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
Nana Patekar Death News: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं घेतला अखेरचा श्वास
Nana Patekar Death News: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं घेतला अखेरचा श्वास
Nana Patekar Video: 48 तासांपूर्वी नाना पाटेकर कुठे होते? गोव्यात काय करत होते? कार्यक्रमातील VIDEO व्हायरल
48 तासांपूर्वी नाना पाटेकर कुठे होते? गोव्यात काय करत होते? कार्यक्रमातील VIDEO व्हायरल
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Raj Thackeray: नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
Bhandara News: पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
Sayaji Shinde On Nana Patekar Passed Away : बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
Nana Patekar: असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
Popatrao Pawar on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
Embed widget