एक्स्प्लोर

Mushtaq Khans Son Mohsin Khan: मुश्ताक खान यांच्यासोबत शेवटच्या 10 दिवसांत नेमकं काय घडलं? लेकाचा खुलासा, वडिलांच्या अखेरच्या दिवसांची आठवण काढताना झाला भावूक

Bollywood Actor Mushtaq Khans Son: मुश्ताक खान यांचा मुलगा मोहसिन खानने काढली वडिलांची आठवण, झाला भावूक.

Bollywood Actor Mushtaq Khans Son Mohsin Khan: दिग्गज अॅक्टर आणि बॉलिवूड सिनेमा गाजवणारे कलाकार मुश्ताक खान (Mushtaq Khan) यांचं 27 स्प्टेंबर रोजी निधन झालं. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून त्या फुफ्फुसाच्या कर्करोगाशी (Cancer) झुंज देत होते, अशी माहिती  समोर आली आहे.  मुश्ताक खान यांनी आपल्या प्रदीर्घ कारकि‍र्दीत   विविध जॉनरच्या चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या.  'हम है राही प्यार के', 'गदर एक प्रेम कथा', 'वेलकम' यांसारख्या सिनेमात काम केलं.  'वेलकम' (Welcome) या सिनेमात त्यांची छोटी भूमिका होती. पण त्यांच्या भूमिकेनं प्रेक्षकांना खळखळून हसवलं.  आपल्या शेवटच्या काळातही मुश्ताक प्रेक्षकांसाठी काम करत होते. मुश्ताक खान यांच्या शेवटच्या दिवसांत नेमकं काय काय घडलं? याची माहिती एका मुलाखतीत मुश्ताक खान यांचा मुलगा मोहसिन खान (Mohsin Khan) याने दिली.

मुश्ताक खान यांचा मुलगा मोहसिन खान याने सांगितले की, 'माझे वडील वर्षभराहून अधिक काळ आजारी होते.  त्यांच्यावर उपचार सुरू होते'. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना मोहसिन म्हणाला,  'वर्षहून अधिक काळ लोटला, माझे वडील गंभीर आजारामुळे त्रस्त होते.  त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारांमुळे त्यांची प्रकृती स्थिर होत चालली होती. पण गेल्या 10 दिवसांत त्यांची प्रकृती अधिक ढासळली.   त्यांची प्रकृती नियंत्रणाबाहेर गेली. वडील खूप चांगले आयुष्य जगले. हॉस्पिटलमध्ये असूनही त्यांनी हसतमुखाने आपले प्राण सोडले', असं मोहसिन खान म्हणाला.

मोहसिन खानने मुलाखतीत खुलासा केला की, त्यांच्या वडिलांचे शेवटचे चित्रिकरण 4 सप्टेंबर रोजी पार पडले (Mushtaq Khans Son Mohsin Khan Reveals Actors Final Days)

मुश्ताक खान यांचा मुलगा मोहसिन खानने सांगितले की, त्यांच्या वडिलांनी शेवटी 4 सप्टेंबर रोजी मड आयलेंड येथे शूटिंग केले होते.  'माझ्या वडिलांनी शेराचा मुलगा टायगर म्हणजेच, अबीर सिंह यांचा डेब्यू फिल्म 'टार्झन' या सिनेमासाठी शूटिंग केली होती. या सिनेमात राजत बेदी, चंकी पांडे आणि राजपाल यादव यांच्याही भूमिका आहेत', असं मोहसिनने सांगितलं. मुश्ताक खान यांचा आगामी तेलुगु चित्रपट 'दादा' लवकरच सिनेमागृहात रिलीज होणार आहे.  हा चित्रपट डिसेंबर महिन्यात रिलीज होणार आहे.   याव्यतिरिक्त अनटाइटल्ड हिंदी-मराठी चित्रपटातही काम केलं आहे.  या सिनेमात मराठी अभिनेता प्रथमेश परब झळकणार आहे.

मोहसिन खानने मुलाखतीत सांगितलं की, मुश्ताक खान यांनी  आपल्या लेकासोबत जास्त काम केलेलं नाही. पण शूटिंग आणि प्रोमोशनच्या वेळी  ते नेहमी त्याच्यासोबत असायचे.   'बाबांनी माझ्यासोबत जास्त काम केलेलं नाही. पण त्यांचा नेहमी पाठिंबा होता.   मी आतापर्यंत त्यांच्यासोबत  दोन टिव्ही जाहिराती केल्या आहेत.  माझ्या हिंदी - मराठी सिनेमात पहिल्यांदाच भूमिका साकारली आहे.  आम्ही शूटिंग पूर्ण केली, पण डबिंग अद्याप झालेलं नाही.  हा सिनेमा त्यांच्यासाठी एक श्रध्दांजली असेल', असं मोहसिन भावूक होत म्हणाला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'विकेंड का वार'मध्ये सलमान खानची सटकली; मनोज तिवारीच्या लेकीवर भडकला, रीतिला भाषेवरुन सुनावलं, काझीला नेमकं काय बोलली?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi Riteish Deshmukh Genelia: विरोध झुगारुन रितेशने जिनेलियाला मांडीवर बसवून फोटो काढला, राहुल गांधींकडून पोस्ट शेअर, बॅकग्राऊंडला शाहरुखचं गाणं
विरोध झुगारुन रितेशने जिनेलियाला मांडीवर बसवून फोटो काढला, राहुल गांधींकडून पोस्ट शेअर, बॅकग्राऊंडला शाहरुखचं गाणं
Gayatri Datar: गायत्री दातार पतीसोबत झाली रोमँटिक, Eiffel Towerसमोर केलं KISS; कॅप्शनने वेधलं लक्ष, PHOTOs
गायत्री दातार पतीसोबत झाली रोमँटिक, Eiffel Towerसमोर केलं KISS; कॅप्शनने वेधलं लक्ष, PHOTOs
KBC 18: खिशात 24 रुपये अन् घर सोडलं; महाराष्ट्राचा लेक झाला करोडपती, KBCच्या एका प्रश्नानं नशीब पालटवलं; म्हणाला, आधी आईचे विकलेले दागिने घेणार
खिशात 24 रुपये अन् घर सोडलं; महाराष्ट्राचा लेक झाला करोडपती, KBCच्या एका प्रश्नानं नशीब पालटवलं; म्हणाला, आधी आईचे विकलेले दागिने घेणार
Sohel Khan Dies: नाश्ता केला अन् हॉटेलमध्ये आला हृदयविकाराचा झटका; शूटिंगदरम्यान अभिनेता सोहेल खानची प्राणज्योत मालवली, नेमकं काय घडलं?
नाश्ता केला अन् हॉटेलमध्ये आला हृदयविकाराचा झटका; शूटिंगदरम्यान अभिनेता सोहेल खानची प्राणज्योत मालवली, नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on Supriya Sule CM Post: सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
UP Election 2027: 'बात सीट की नहीं, जीत की है', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर अखिलेश यादवांची भली मोठी पोस्ट, दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडची नाराजी, जागावाटपावरून खलबतं सुरू
'बात सीट की नहीं, जीत की है', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर अखिलेश यादवांची भली मोठी पोस्ट, दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडची नाराजी, जागावाटपावरून खलबतं सुरू
Sanjay Raut On Sanjay Shirsat: नाथानी हाइट्स बिल्डिंगच्या 72व्या मजल्यावर बोलावलं; 20 टक्के मागितले, मंत्री संजय शिरसाटांचं नाव घेत संजय राऊतांचा नवा बॉम्ब, नेमकं काय म्हणाले?
नाथानी हाइट्स बिल्डिंगच्या 72व्या मजल्यावर बोलावलं; 20 टक्के मागितले, मंत्री संजय शिरसाटांचं नाव घेत संजय राऊतांचा नवा बॉम्ब, नेमकं काय म्हणाले?
Pune Devram Lande: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....
Pune Crime News: पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार; बंदूक टाकून आरोपी फरार, नेमकं काय घडलं?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार; बंदूक टाकून आरोपी फरार, नेमकं काय घडलं?
Pune Flex: पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिम; भाजपचेच ‘नेते’ आघाडीवर, पालिकेकडून विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी जाहीर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंसह नगरसेवक पृथ्वीराज सुतार, पांडे यादीत
पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिम; भाजपचेच ‘नेते’ आघाडीवर, पालिकेकडून विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी जाहीर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंसह नगरसेवक पृथ्वीराज सुतार, पांडे यादीत
Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तीन महिन्यांपासून वाद, रागात प्रेयसीचं डोकं आधी भिंतीवर मग बेडवर आपटलं... इन्फोसिसच्या शुभमने विप्रोच्या कोमलला संपवलं अन्...
साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तीन महिन्यांपासून वाद, रागात प्रेयसीचं डोकं आधी भिंतीवर मग बेडवर आपटलं... इन्फोसिसच्या शुभमने विप्रोच्या कोमलला संपवलं अन्...
Sunetra Pawar and Supriya Sule: यशवंतराव चव्हाणांचा स्मृतीदिन; साताऱ्यात सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळे एकाच मंचावर, नतमस्तक होत चर्चा, नेमकं काय घडलं?
यशवंतराव चव्हाणांचा स्मृतीदिन; साताऱ्यात सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळे एकाच मंचावर, नतमस्तक होत चर्चा, नेमकं काय घडलं?
Embed widget