Akshay Kumar Actress Life Story: इंडस्ट्रीमध्ये (Film Industry) अशा अनेक अभिनेत्री (Bollywood Actress) आहेत, ज्या सध्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर आहेत. त्यांचे सिनेमे अगदी बॉक्स ऑफिसवर (Box Office Hit) हिट ठरतायत. नव्वदच्या दशकातही अशा अनेक अभिनेत्री (Bollywood Actress) होत्या, ज्यांनी फारच कमी दिवसांत प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला. पण, यशाच्या सर्वोच्च शिखरावर असूनही नैराश्याच्या शिकार झाल्या. त्यांनी स्वतःला संपवण्याचाही प्रयत्न केला. आज आम्ही अशाच एका अभिनेत्रीबाबत सांगत आहोत, जिनं फारच कमी दिवसांत प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला, पण नंतर नैराश्याची शिकार झाली. एकदा नाहीतर, तब्बल  7 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. 

Continues below advertisement


साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री मोहिनी, जेवढी सुंदर होती, तितकीच ती तिच्या मनानंही सुंदर होती. आश्चर्याची बाब म्हणजे, मोहिनीनं एकदा, दोनदा नाहीतर तब्बल सात वेळा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. मोहिनीनं स्वतः एका मुलाखतीत बोलताना याबाबत धक्कादायक खुलासा केलेला.  


मोहिनीनं तिच्या कारकिर्दीत अनेक प्रभावी भूमिका केल्या आणि प्रचंड लोकप्रियता मिळवली. पण, गेल्या बऱ्याच दिवसांपासून ती बराच काळ प्रसिद्धीपासून दूर आहे. एका मुलाखतीत बोलताना तिनं तिच्या आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले. तिनं उघड केलं की, ती नैराश्यानं ग्रस्त होती आणि तब्बल सात वेळा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलेला.


नैराश्याची झालेली शिकार


जेव्हा ती एका ज्योतिषाकडे गेली, तेव्हा तिला कळलं की, कोणीतरी तिच्यावर काळी जादू केली आहे. अभिनेत्रीला तिच्या पतीच्या नातेवाईकांवर संशय होता. अभिनेत्रीनं एका मुलाखतीत बोलताना सांगितलेलं की, लग्नानंतर ती तिच्या पती आणि मुलांसह चांगलं जीवन जगत होती. पण एक वेळ अशी आली, जेव्हा तिला वाटलं की, ती नैराश्याची शिकार झाली आहे.


तिच्या आयुष्यात काहीही चुकीचं घडत नव्हतं, तरीही ती नैराश्याच्या गर्तेत ओढली जात होती. एका क्षणी तिनं स्वतःला संपवण्याचा प्रयत्नही केला. एकदा नाही तर तब्बल सात वेळा... या सर्वांवर मात करण्यासाठी तिनं एका ज्योतिषाची मदत घेतली. अभिनेत्रीनं सांगितलं की, एका ज्योतिषानं तिला सांगितलं की, कोणीतरी तिच्यावर काळी जादू केली आहे. 


ब्राह्मण कुटुंबात झालेला जन्म


सुरुवातीला ज्योतिषानं सांगितलेल्या गोष्टी अभिनेत्रीनं हलक्यात घेतल्या. पण, नंतर विचार केल्यावर,  मी  आत्महत्या करण्याचं धाडस कसं केलं, याचंच आश्चर्य वाटलं. अनेक गोष्टी लक्षात आल्यानंतर, मी त्यावर मात करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मला येशूनं मदत केली. मोहिनीचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला होता, पण 2006 मध्ये अभिनेत्रीनं ख्रिश्चन धर्म स्वीकारला.


अभिनेत्रीनं बोलताना सांगितलेलं की, ती सतत मृत्यूबद्दल विचार करू लागलेली. पण, तिच्याकडे सर्व काही असूनही ती असा विचार का करत होती, याचा मला प्रश्न पडलेला. माझी ही परिस्थिती माझ्या पतीच्या चुलत बहिणीमुळे झालेली. तिनं तिच्यावर काळी जादू केलेली. पण येशूवरील माझ्या श्रद्धेनं मला वाचवलं, असंही अभिनेत्रीनं सांगितलं. दरम्यान, 1991 मध्ये आलेल्या 'डान्सर' चित्रपटात तिनं अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर केलेली.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Tanushree Dutta On Bigg Boss: 'मी इतकी 'स्वस्त' नाही, रिअॅलिटी शोसाठी एका पुरूषासोबत एकाच बेडवर...'; तनुश्री दत्ता 11 वर्षांपासून नाकरतेय 'बिग बॉस'च्या ऑफर्स